आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज हे 1 काम केल्यास जीवनात मिळेल मान-सन्मान, ऐश्वर्य आणि यश

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये पूजेच्या विधी आणि महत्त्वाविषयी विविध गोष्टी सांगितल्या आहेत. जे लोक पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने देवाची पूजा करतात, त्यांना जीवनात प्रत्येक सुख प्राप्त होते. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार दररोज देवाची पूजा केल्याने प्राप्त होतात या 4 गोष्टी...

1. पवित्रता
जे लोक सकाळी लवकर उठून स्नान करून देवाची पूजा करतात त्यांच्या सर्व चुका माफ होतात. देवाची उपासना केल्याने मनुष्याचे मन स्वच्छ होते आणि त्याला प्रत्येक कामात यश मिळते.

2. प्रगती
ज्या लोकांना जीवनात प्रगती करण्याची आणि यशस्वी होण्याची इच्छा असेल, त्यांनी प्रामाणिक कष्ट करण्यासोबतच देवाचे स्मरण आणि उपासना करावी. जो व्यक्ती संपूर्ण विश्वासाने आणि भक्तिभावाने देवाची उपासना करतो त्याला निश्चितच सर्व कामामध्ये यश प्राप्त होते. जे लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत तसेच देवाची पूजा-अर्चना करत नाहीत, त्यांना अनेकदा कष्टाचे फळ मिळत नाही.

3. मान-सन्मान आणि ऐश्वर्य
ज्या व्यक्तीला घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान प्राप्त करण्याची इच्छा असेल त्याने पूजा-पाठ, उपासनेमध्ये मग्न व्हावे. जो मनुष्य पापकर्म सोडून, पवित्र मनाने देवाची पूजा करतो त्याच्यावर नेहमी देवाची कृपादृष्टी राहते आणि त्याला सुख-शांती, मान-सन्मान प्राप्त होतो.

4. पापातून मुक्ती
अनेक लोक नकळतपणे किंवा जाणूनबुजून अशी काही कामे करतात, ज्यामुळे त्यांना पापाचे भागीदार व्हावे लागते. या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी मनुष्याने पूर्ण श्रद्धेने पवित्र पाण्यामध्ये स्नान करून देवाची पूजा करावी. असे केल्याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला सुखाची प्राप्ती होते.

बातम्या आणखी आहेत...