Home | International | Other Country | Doklam issue for Prime Minister is like an event : Rahul gandhi

पंतप्रधानांसाठी डोकलाम वाद एखाद्या इव्हेंटसारखा : राहुल गांधी

वृत्तसंस्था | Update - Aug 25, 2018, 07:58 AM IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जर्मनीची राजधानी बर्लिनहून ब्रिटनच्या लंडनमध्ये पोहोचले आहेत. तेथे पोहोचताच राहुल म्हणाले,

  • Doklam issue for Prime Minister is like an event : Rahul gandhi

    लंडन-बर्लिन- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जर्मनीची राजधानी बर्लिनहून ब्रिटनच्या लंडनमध्ये पोहोचले आहेत. तेथे पोहोचताच राहुल म्हणाले, चीनसोबत डोकलाममध्ये संघर्ष ही एकमेव घटना आहे. ती अनेक घटनांपैकी आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी डोकलाम केवळ एक इव्हेंट होता. ते सावध असते तर त्यांनी सतर्कतेने संपूर्ण घटनाक्रम पाहिला असता. तसे केले असते तर काही गोष्टी रोखता आल्या असत्या, असा दावा राहुल यांनी केला आहे.


    राहुल शुक्रवारी लंडनच्या रणनीतिसंबंधीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज या संस्थेत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. डोकलाममध्ये आजही चीनचे अस्तित्त्व दिसून येते यात तथ्य आहे, असे यांनी सांगितले. राहुल यांचे हे वक्तव्य सरकारच्या संसदेतील वक्तव्याच्या अगदी विरोधात आहेत. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी गेल्या महिन्यात राज्यसभेत डोकलामबद्दलचे वक्तव्य केले होते. गेल्या वर्षी २८ ऑगस्ट नंतर स्थिती जैसे थै असल्याचा दावाही त्यांनी वक्तव्यातून सभागृहात केला होता. माहिती कायदा ही संपुआ सरकारची कामगिरी आहे.


    पाकिस्तानविषयी धोरण नाही...

    राहुल लंडनमध्ये पाकिस्तानच्या मुद्द्यावरही बोलले. पाकिस्तानच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीयां यांच्याकडे कसलेही धोरण नाही. पाकिस्तानसोबत चर्चा करणे अतिशय कठीण आहे. कारण तेथे सर्वोच्च म्हणावी, अशी कोणतीही संस्था शिल्लक नाही.

Trending