आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासैफ अली खान आणि करिना यांचा स्टार किड तैमूर अली खान गेल्या काही वर्षातील सर्वात प्रसिद्ध स्टार किड आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गेल्या काही काळात तर तैमूरच्या अगदी कपड्यांपासून ते त्याच्या लहान सहान हालचालींबाबतच्या बातम्या मीडियामध्ये येत होत्या. त्यावरून सोशल मीडियावर बऱ्याचदा ट्रोलिंगही झाले. पण या सर्वामुळे तैमूर प्रचंड प्रसिद्ध झाला. त्याची प्रसिद्धी एवढी वाढली आहे की त्याच्यासारखे दिसणारे आणि त्याच्या नावाचे खेळणे बाजारात दाखल झाले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ट्विटरवर सध्या एक फोटो शेअर केला जात आहे. त्यात एक बाहुला दिसत आहे. हा बाहुला तैमूरसारखा दिसणारा आहे. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, केरळच्या एका स्टोरमध्ये हा बाहुला विक्रीसाठी ठेवलेला आहे. त्याचा चेहरा, केस सर्वकाही तैमूर सारखेच आहे. एवढेच नाही, या खेळण्याचे नावही तैमूर आहे.
Meanwhile at a toy store in Kerala... pic.twitter.com/J2Bl9UnPdT
— Ashvini Yardi (@AshviniYardi) November 19, 2018
ऑनलाइनही मिळेल तैमूर
हे खेळणे ऑनलाइनही उपलब्ध आहे. लहान मुलांची खेळणी विकणाऱ्या वेबसाइटवरही ते उपलब्ध आहे. सरासरी 1000 ते 1500 च्या दरम्यान या खेळण्याची किंमत आहे. तैमूर प्रमाणे त्याच्या नावाचे हे खेळणेही सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहे.
1500 रुपयांत विकतो तैमूरचा एक फोटो
सैफ अली खान आणि केदारनाथद्वारे डेब्यू करणारी त्याची मुलगी सारा हे दोघे नुकतेच करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये आले होते. त्यावेळी सैफने सांगितले होते की, तैमूरचा एक एक फोटो 1500 रुपयांमध्ये विकला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.