Home | Business | Business Special | Domestic and commercial LPG connections requirement of dealers

व्यवसायाची सुवर्णसंधी : LPG कनेक्शन विक्रीसाठी सर्व जिल्ह्यामध्ये डिलर्सची गरज; लवकर करा अर्ज, डिपॉझिटची गरज नाही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 21, 2019, 04:28 PM IST

पण कडक आहेत डिलरशिपसाठीच्या नियम व अटी

 • Domestic and commercial LPG connections requirement of dealers


  नवी दिल्ली - तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. कारण आता आपल्याला एलपीजी गॅस एजन्सी सुरू करण्याची संधी मिळणार आहे. 'गो गॅस' कंपनी खूप वेगाने आपले डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क वाढवत आहे. यामुळे आपल्याला नियमित इनकम मिळणारा व्यवसाय सुरू करण्याची संधी आहे. गो गॅसने नवीन एलपीजी डिलरशीप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला जर ही एलपीजी एजन्सी मिळाली तर ही तुमच्यासाठी लाइफ टाइम अपॉर्च्युनिटी ठरू शकते. परंतू ही डीलरशीप प्राप्त करण्यासाठी नियम व अटी अत्यंत कठीण आहेत.


  डिलरशिपसाठी असलेल्या अटी
  1 उमेद्वारकडे एखादा व्यवसाय सुरू असावा.
  2 आर्थिक बाजू सक्षम आणि व्यवसायात गुंतवणूक करण्याची क्षमता.
  3 पेस्को अंतर्गत एलपीजी सिलेंडरच्या देखरेखीसाठी गोडाऊन.
  4 सिलेंडर वितरित करण्यासाठी स्वतःचे किंवा किरायाचे वाहन.
  5 यासाठी उमेद्वाराला डिपॉझिट जमा करण्याची गरज नाही.
  6 व्यक्तीकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.


  असा करा अर्ज
  डिलरशीप घेण्यासाठी उमेद्वाराला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  आपण या URL:- http://elitegogas.com लिंकवर अर्ज करू शकता.
  तसेच या नंबरवर संपर्क करू शकता 7620250251


  आधुनिक आहे गॅस सिलेंडर

  गो गॅस इलाइटनूसार जुन्या गॅसच्या तुलनेत हा खूप आधुनिक आहे. हे सिलेंडर पारदर्शी, हलके तसेच हे ब्लास्ट प्रुफ आहे. गॅस सिलेंडर एजन्सी डिलरशीपने हे सिलेंडर 2019 मध्ये 2 किलो, 10 किलो आणि 20 किलोमध्ये उपलब्ध केले आहेत. आपण या सिलेंडरचा हॉटेल, लग्न, घरात इ. ठिकाणी उपयोग करू शकता. गॅस सिलेंडर एजन्सी डिलरशिप 2019 नुसार भारतातील 22 राज्यामध्ये 16 मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि 125 ऑटो एलपीजी डिस्पेंसिंग युनिट आहेत. जीएम सुमित बदरा आणि डिजीएम शैलेंद्र नुसार हे सिलेंडर खूप सुरक्षित आहे. याचा कोणीही उपयोग करू शकतो.

Trending