आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींवरील परीक्षेेत डॉन गवळी अव्वल; सकारात्‍मक बदल व्‍हावेत, तरुंग अधिका-यांची अपेक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मुंबईचा डॉन अरुण गवळी हा नागपूर कारागृहात घेण्यात आलेल्या गांधी विचारधारेच्या परीक्षेत अव्वल ठरला आहे. यानिमित्ताने तरी गवळीवर गांधी विचारांचा प्रभाव पडावा, असे मत कारागृह अधिकारी व्यक्त करत आहेत.   


सहयोग ट्रस्ट, सर्वोदय आश्रम आणि मुंबई सर्वोदय मंडळाच्या वतीने दरवर्षी कारागृहातील कैद्यांसाठी गांधी विचार परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या निमित्ताने तरी कैद्यांनी गांधी विचारांचा अभ्यास करावा आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवावा, या अपेक्षेने ही परीक्षा घेतली जाते. यावर्षी नागपुरातील १६० कैद्यांनी ही परीक्षा दिली. त्यात डॉन अरुण गवळीचादेखील समावेश होता.

 

या परीक्षेत गवळी अव्वल ठरला आहे. याशिवाय २०१५ मध्ये नागपूर कारागृहाची सुरक्षा व्यवस्था भेदून पसार झालेले मोक्काचे पाच कैदीही या परीक्षेत उत्तीर्ण झाले असल्याची माहिती सहयोग ट्रस्टचे रवींद्र भुसारी यांनी दिली. या परीक्षेसाठी कैद्यांना गांधी विचारांचे साहित्य पुरवण्यात आले होते. कैद्यांनी त्यावर बराच अभ्यास करून परीक्षा दिली. गांधी विचारांच्या परीक्षेत अव्वल ठरल्याने अरुण गवळीमध्ये सकारात्मक बदल व्हावेत, अशी अपेक्षा कारागृह अधिकारी व्यक्त करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...