आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Donald Trump Coronavirus | US President Donald Trump Coronavirus Updates From World Death Toll.

145 देशांत पसरला संसर्ग : अमेरिकेत आणीबाणी घोषित; जगभरात 1.45 लाख लोकांना लागण, 5436 जणांचा मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत कोरोना व्हायरसचे आतापर्यंत एकूण 2 हजार प्रकरणे, 50 लोकांचा मृत्यू
  • अमेरिकेत परदेशी जहाजांवर 30 दिवसांपर्यंत बंदी

वॉशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांनंतर अमेरिकेत राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीची घोषित केली. तसेच सर्व राज्यांना त्वरित कठोर खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सांगितले गेले आहे. ट्रम्प म्हणाले की, "मी अधिकृतपणे देशात आपत्कालीन स्थिती जाहीर करतो. यूएस राज्यांमधील कोरोनाव्हायरस साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला ट्रम्प प्रशासनाकडून 50 अब्ज डॉलर्स देण्यात येतील." दुसरीकडे जगभरात कोरोना व्हायरसचे एकूण 1 लाख 45 हजार 634 प्रकरणे समोर आली आहेत. आज (शनिवार) सकाळपर्यंत एकूण 5436 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

ट्रम्प यांनी राज्यांना केले आवाहन


अमेरिकेचे राष्ट्रपतींनी राज्यांना आवाहन केले की, "सर्व राज्यांनी या संकटाच्या वेळी कोरोनाव्हायरसशी सामना करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात. या संकटाला सामोरे जाण्यासाठी आम्ही राज्यांना 50 अब्ज डॉलर्सचा निधी जारी करीत आहोत. एक राष्ट्रीय डेटा सेंटर आणि स्पेशल युनिट तयार केले गेले आहे. यातून संपूर्ण देशाचे निरीक्षण केले जाईल. या महामारीपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकन सरकार प्रत्येक पावले उचलणार आहे."अमेरिकेत किती प्रकरणे

शुक्रवारी रात्रीपर्यंत अमेरिकेत कोरोना व्हायरसचे एकूण दोन हजार प्रकरणे समोर आली आहेत. तर आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी परदेशातील जहाजांना अमेरिकन बंदरांवर येण्यास बंदी घातली आहे. मेक्सिको आणि इतर देशांच्या सीमेवर उच्च थर्मल स्कॅनर बसवण्यात आले आहेत. अमेरिकन सैन्याच्या विशेष वैद्यकीय युनिटलाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सतर्क राहण्यास सांगितले आहे.

गुगलची देखील घेणार मदत

ट्रम्प म्हणाले की, गुगलशी संबंधित अल्फाबेट कंपनी एक वेबसाइट तयार करत आहे. या वेबसाइटवर भेट देऊन, लोक कोरोनाव्हायरसच्या लक्षणांशी संबंधित माहिती मिळवून आपल्या आरोग्याबद्दल जाणून घेतील. गुगलने देखील ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. 
 

भारतीय दुतावासाने दिला सल्ला 

अमेरिकेतील भारतीय दुतावासने आपल्या देशातील विद्यार्थ्यांना सल्ला दिला की, या क्षणी कोणताही अनावश्यक प्रवास टाळावा. ट्रम्प यांनी अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यानंतर दूतावासाने ही घोषणा केली.जगातील 10 सर्वाधिक प्रभावित देश आणि तेथील मृत्यूची संख्या

देशप्रकरणेएकूण मृत्यू
चीन

80,824    

3,189

इटली17,660  1,266
इराण

11,364  

514
दक्षिण कोरिया

8,086    

72

स्पेन

5,232  

133

जर्मनी

3,675    

8

फ्रान्स

3,661  

79

अमेरिका

2,291    

50

जपान 1,430  

28

स्वित्झर्लंड

1,139  

11
भारत822

*टीपः ही आकडेवारी 14 मार्च शनिवारी सकाळपर्यंतची आहे.

बातम्या आणखी आहेत...