आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न समारंभासाठी भारतात येणार Trump यांचे जावई; मुलगी Ivanka येण्यावर अजुनही सस्पेन्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनेर गुरुवारी (29 नोव्हेंबर) जैसलमेरला पोहोचणार आहेत. जावयासोबत ट्रम्प यांची मुलगी इव्हांका येणार किंवा नाही यावर अजुनही सस्पेन्स आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तिच्या दौऱ्यावर अधिकृत माहिती किंवा शेड्युल जारी करण्यात आलेला नाही असे सांगितले जात आहे. अमेरिकेत भारतीय वंशाचे उद्योजक आपल्या मायदेशी येऊन लग्न करत आहेत. त्याच लग्नात सहभागी होण्यासाठी कुशनेर भारतात येत आहेत. 


तीन दिवस जैसलमेरमध्येच...
- इव्हांका आणि कुशनेर यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जैसलमेरमध्ये चोख सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. खास अमेरिकेहून आलेले 50 सीक्रेट सर्विस एजंट या सुरक्षेचा आढावा घेत आहेत. कपलच्या दौऱ्यापूर्वीच ते जैसलमेरमध्ये दाखल झाले आहेत.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सल्लागार म्हणूनही कार्यरत असलेली मुलगी इव्हांका जैसलमेरला येणार असे जाहीर करण्यात आले होते. यानंतर मात्र, तिच्या दौऱ्याच्या शेड्युलवर किंवा ती येणार किंवा नाही यावर दुमत निर्माण झाले. स्थानिक प्रशासनाने सुद्धा इव्हांकाच्या दौऱ्यावर कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, कुशनेर आपल्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यात जैसलमेरमध्येच राहणार असे सांगितले जात आहे.

 

बातम्या आणखी आहेत...