आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांनी लपवली हाेती श्रेणी; शाळेने केले स्पष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाॅशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प हे ‘मी लहानपणी खूप हुशार हाेताे व यामुळे शिक्षक माझे नेहमी काैतुक करायचे. तसेच मी शिस्तप्रिय व्हावे असाच माझ्या आई-वडिलांचा प्रयत्न हाेता, असा दावाही नेहमीच करत असतात. मात्र, आता ट्रम्प यांचे शिक्षण झालेल्या शाळेने नेमके याउलट मत व्यक्त केले आहे. संबंधित शाळेने दावा केला आहे की, ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी ट्रम्प यांची शिक्षणाची श्रेणी लपवण्यासाठी दबाव टाकला हाेता. अमेरिकेतील एका सैन्य अकादमीने म्हटले आहे की, ट्रम्प किशोरावस्थेत असताना २०११ मध्ये त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती लपवण्यात आली हाेती. या संस्थेत ट्रम्प यांनी पाच वर्षे घालवली हाेती. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राने त्यांच्या वृत्तात याबाबतचा खुलासा केला आहे.  


हेडमास्तर म्हणाले...सैन्य शाळेचे हेडमास्टर इव्हान जोन्स यांनी ‘वाॅशिंग्टन पाेस्ट’ला याबाबतची माहिती दिली आहे. एका खासगी शाळेचे अधीक्षक माझ्याकडे आले हाेते. ते खूप घाबरलेले हाेते. कारण त्यांच्या शाळेचे माजी विद्यार्थी व ट्रम्प यांच्या मित्रांनी त्यांना ट्रम्प यांची शैक्षणिक माहिती गुप्त ठेवण्यास सांगितले हाेते. मात्र, त्यांनी तसे करण्यास नकार दिला, असे जाेन्स यांनी सांगितले. 


बराक आेबामांना दिले हाेते आव्हान  
डाेनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपतिपद निवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांना त्यांची संपूर्ण शैक्षणिक माहिती सार्वजनिक करण्याचे आव्हान दिले हाेते. आेबामांसारखा ‘ढ’ विद्यार्थी आयव्ही लीग शाळेत शिकत हाेता, याचे मला नेहमी आश्चर्य वाटते, अशी टीका ट्रम्प नेहमीच करायचे.  

बातम्या आणखी आहेत...