आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेचे राष्ट्राध्य झाले तेव्हापासून ट्रम्प यांनी केले 10 हजार खोटे दावे, रोज करतात सरासरी 12 खोटी विधाने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीएम मोदी, काश्मीरवर खोटे विधान करून चर्चेत आहेत डोनाल्ड ट्रम्प - Divya Marathi
पीएम मोदी, काश्मीरवर खोटे विधान करून चर्चेत आहेत डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या काश्मीरवरून खोटे विधान करून चर्चेत आहेत. त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा करताना पीएम नरेंद्र मोदींनी काश्मीरवर मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता असा दावा केला. त्यांचा दावा भारतानेच नव्हे, तर अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी खोटा ठरवला. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदावर असताना खोटे बोलण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी अनेकवेळा खरं पाहिल्यास रोज डझनभरवेळा ते खोटे बोलतात. आता अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक वॉशिंग्टन पोस्टने एक रिपोर्ट जारी केली आहे. त्यानुसार, ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली तेव्हापासून ते 10,796 वेळा खोटे बोलले आहेत.


डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेऊन जवळपास दोन वर्षे उलटली आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्याच 869 दिवसांत 10,796 वेळा खोटे दावे केले आहेत. खोटे दावे करणे आणि देश-विदेशातील लोकांची दिशाभूल करताना ते रोज सरासरी 12 वेळा खोटे बोलतात असे वॉशिंग्टन पोस्टच्या फॅक्ट चेकर्स डेटाबेसमधून समोर आले आहे. यातील सर्वात जास्त खोटे दावे त्यांनी शरणार्थी संकटावर केले आहेत. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ट्रम्प यांनी अमेरिका आणि मेक्सिको सीमेवर स्टीलची उंच भिंत उभारणार असल्याचे आश्वास दिले होते. त्याची पूर्तता करण्यासाठी मंजुरी मिळवण्याकरिता त्यांनी खोटे दावे केले. शरणार्थी आणि घुसखोरांची समस्या मांडता त्यांनी अतिश्योक्ती देखील केली. ट्रंप यांनी 172 वेळा खोटा दावा केला की सीमेवर भिंत बांधली जात आहे. या व्यतिरिक्त रशियावर सुद्धा त्यांनी खोटी विधान केली आहेत.