आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Donald Trump Made A Surprise Visit To Afghanistan, Thanked The American Troops There, And Had Dinner With Them

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक केला अफगानिस्तानचा दौरा, तेथील अमेरीकेच्या सैनिकांचे आभार मानले, सोबत जेवणही केले...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अफगानिस्तान दौऱ्याची कोणतीही औपचारिक घोषणा झाली नाही
  • अफगान राष्ट्रपती अशरफ गनी यांना ट्रम्प येत असल्याची माहिती लँडींगपूर्वीच कळाली
  • ट्रम्प थँक्सगिविंग डेनिमित्ताने सैनिकांना धन्यवाद देण्यासाठी पोहचले

काबुल/वॉशिंग्टन- अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल(गुरुवार) अचानक अफगानिस्तानात पोहचले. थँक्सगिविंग डेच्या निमित्ताने ट्रम्प अफगानिस्तानात तालिबानशी सामना करत असलेल्या अमेरिकेच्या सैनिकांना भेटण्यासाठी आणि त्यांना धन्यवाद देण्यासाठी तिथे पोहचले. ते काबुलमध्ये अडीच तास थांबले होते. हा त्यांचा पहिलाच अफगानिस्थान दौरा होता. ट्रम्प प्रशासनाकडून या दौऱ्याची कोणतीच औपचारिक घोषणा करण्यात आली नव्हती. सुरक्षा कारणांमुळे अफगानिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी, यांनाही ट्रम्प यांच्या येण्याची माहिती त्यांच्या लँडिंगपूर्वी देण्यात आली.
  

अमेरिकेत नोव्हेंबरच्या चौथ्या गुरुवारी थँक्सगिविंग डे साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण देशात सुट्टी असते. या दिवशी सर्वजण आपले मित्र, नातेवाईक, आणि इतरांचे आभार मानतात. 1789 मध्ये काँग्रेस (अमेरिकीतील संसद)च्या आग्रहानंतर राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी थँक्सगिविंग डेची सुरुवात केली होती.

स्वतः जेवणाची इच्छा व्यक्त केली

ट्रम्प यांनी काबुलमधील बगराम एयरफील्डवर असलेल्या सैनिकांची भेट घेतली. त्यांच्यासोबत ट्रम्प यांनी जेवण केले आणि फोटोही काढले. यावेळी ट्रम्प सैनिकांना म्हणाले की, मी तुमच्याशी नंतर बोलतो, आधी आपण सगळे मिळून काहीतरी खाऊयात. त्यानंतर ट्रम्प यांनी अफगानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांची भेट घेतली. ट्रम्प यांच्या कार्यक्रमासाठी काही निवडक पत्रकार त्यांच्यासोबत होते. यावेळी अमेरीकी सैनिकांना अफगान राष्ट्रपतींनी संबोधित केले. ते म्हणाले की, अमेरीकेच्या सैनिकांच्या मदतीने अफगानी सैनिकांनी आयएसला हरवण्यात खूप मदत मिळाली.