आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Donald Trump On Taliban: US President Talks To Talibani Leader Mullah Abdul Ghani Baradar Over Afghanistan Peace

तालिबानच्या हल्ल्यात 20 अफगानी सैनिकांचा मृत्यू; ट्रम्प आणि तालिबान नेत्याची चर्चा झाल्याच्या काही तासातच झाला हल्ला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डोनाल्ड ट्रम्प आणि तालिबानमध्ये नंबर दोनचा नेता मुल्ला अब्दुल गनी बरदार यांच्यात मंगळवारी फोनवर चर्चा झाली

वॉशिंग्टन/काबुल- अफगानिस्तानमध्ये मंगळवारी रात्री दहशतवादी संघटना तालिबानने केलेल्या हल्ल्यात 20 अफगानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, या हल्यापूर्वीच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तालिबान नेता मुल्ला बरदार यांच्यात फोनवर चर्चा झाली होती.


यात तालिबान, अफगान सरकार आणि अमेरिकेदरम्यान 29 फेब्रुवारीला झालेल्या शांती कराराला लागू करण्यासंबंधी चर्चा झाली होती. ट्रम्प यांनी याला यशस्वी म्हणत तालिबानला गुड लकदेखील म्हटले होते. या चर्चेच्या काही तासातच तालिबानने हल्ला केला, त्यामुळे या चर्चेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


ट्रम्प आणि बरदारच्या चर्चेनंतर व्हाइट हाउसने एका वक्तव्य जारी कले होते. त्यानुसार, एखाद्या दहशतवादी संघटनेचा नेता आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्षांमध्ये ही पहिलीच चर्चा आहे, ज्याबाबत सार्वजनिकरित्या पुष्टी केली जात आहे. अफगान शांतीसाठी 29 फेब्रुवारीला अमेरिका, अफगानिस्तान सरकार आणि तालिबानदरम्यान एक करार झाला होता. पण, कैद्यांना सोडण्याबाबत विरोधाभासी वक्तव्य येत होती. सर्व संबंधित पक्ष 10 मार्चपासून ओस्लो (स्वीडन)मध्ये बैठक करतील. यात शांती स्थापन करण्यासाठी पुढील रुपरेषा ठरवली जाईल. 

करार आणि हिंसा सोबतच ?

अफगानिस्तान सरकार, अमेरिका आणि तालिबानदरम्यान एक करार झाला होता, त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मंगळवारी संध्याकाळी ट्रम्प आणि बरदारची फोनवर चर्चा झाली. त्यानंतर काही तासातच तालिबानने कुंदूज प्रांतच्या बाग-ए-शेरकत सैन्य बेसवर हल्ला केला, यात 20 अफगान सैनिकांचा मृत्यू झाला. याशिवाय तालिबानच्या ताब्यातील काही भागांमध्येही हिंसाचार भडकला. यामुळे झालेल्या करारावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

ट्रम्पने मुल्लाला म्हटले- हिंसा तात्काळ बंद व्हायला हवी

व्हाइट हाउसकडून सांगण्यात आलेल्या वक्तव्यानुसार, “ट्रम्प यांनी तालिबान नेत्याला स्पष्टपण सांगितले होते की, हा करार यशस्वी होण्यासाठी हिंसा तात्काळ बंद व्हायला हवी. ही चर्चा सकारात्मक झाली होती. अमेरिकेने स्पष्ट केले आङे की, अफगानिस्तानमध्ये शांती कायम राखण्यासाठी योग्य ती पाऊले उचलली जातील.”