आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पात्र, मदतीसाठी सक्षम असाल तरच अमेरिकेत स्वागत : ट्रम्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेत येण्यासाठी पात्रता असली पाहिजे आणि अमेेरिकेला मदत करण्याची सक्षमता असावी. बेकायदा पद्धतीने घुसखोरी करता कामा नये, अशा शब्दांत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुनावले आहे. व्हाइट हाऊसमध्ये रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सीमा प्रश्नावर माझी भूमिका कडक आहे. अमेरिकेत येण्यासाठी कायदेशीर मार्गानेच आले पाहिजे. कायद्याचे काटेकोरपणे पालन झालेच पाहिजे. अवैध पद्धतीने प्रवेश करणाऱ्यांना मुळीच थारा दिला जाणार नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले. बेकायदा स्थलांतरितांच्या प्रश्नावर ट्रम्प यांनी हे उत्तर दिले. आम्ही पात्रता लक्षात घेऊनच जगभरातील लोकांना निमंत्रित करण्यासाठी उत्सुक आहोत. ट्रम्प म्हणाले- अमेरिका जगातील सर्वात लोकप्रिय देश आहे. त्यामुळेच लोक या देशात येऊ इच्छितात. 

 

- ७.५ लाख भारतीय ईबी-५ व्हिसा मिळावा यासाठी इच्छुक 
- चेन मायग्रेशन धोरण चुकीचे, व्यवस्था बिघडत चाललीये 
- एच-१ व्हिसा बदलल्यानंतर पर्यायी मार्गाची निवड केली 

 

जुलै २०१८ पर्यंत ७.५ लाख भारतीयांनी परदेशात व्हिसासाठी अर्ज केला होता. त्यापैकी २.१ लाख विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छितात. कारण त्यामुळे तत्काळ नोकरी व ग्रीन कार्ड मिळू शकतो. अलीकडेच एच-१ व्हिसाच्या नियमांत बदल व ग्रीन कार्ड देण्याच्या नियमांची कडक अंमलबजावणीमुळे अमेरिकेत स्थायिक होणे काहीसे कठीण बनले आहे.म्हणूनच भारतासह इतर देशांचे लोक ईबी-५ व्हिसाची मदत घेऊ लागले आहेत. 

 

ट्रम्प म्हणाले- भारतीयांसाठी नवीन धोरण फायदेशीर ठरणारे 
ट्रम्प यांना पत्रकारांनी बेकायदा स्थलांतरित झालेल्यांबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर ट्रम्प यांनी पात्र लोकांना अमेरिकेत प्रवेशाची परवानगी असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या भूमिकेवर भारतासारख्या देशांतील व्यावसायिकांना मदतच होणार आहे. अमेरिकेत एप्रिल २०१८ पर्यंत रोजगाराधारित प्राथमिकतेच्या श्रेणीत ३ लाख ९५ हजार २५ परदेशी नागरिक ग्रीन कार्ड मिळवणाऱ्यांच्या रांगेत होते. त्यात ३ लाख ६ हजार ६०१ एवढी भारतीयांची संख्या होती. त्यावरून भारतीयांचा कल अमेरिकेकडे असल्याचे स्पष्ट होते. 

 

ईबी-५ व्हिसासाठी अर्जांची संख्या तीनपट 
गेल्या चार वर्षांत ईबी-५ व्हिसाअंतर्गत अर्जांची संख्या तीनपटीने वाढली आहे. भारतीयांना या वर्गवारीअंतर्गत ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी सुमारे ३.५ कोटी रुपये पत्नी व अविवाहित मुलांच्या नावे गुंतवावे लागतात. त्यासाठी शिक्षण किंवा इतर निकषांची आवश्यकता नसते. ईबी-५ व्हिसा मिळाल्यानंतर व्यक्ती अमेरिकेत कोठेही स्थायिक होऊ शकते. 

 

ट्रम्प यांचे धोरण  घुसखोरी रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष म्हणाले, पात्रता हाच आधार 
ट्रम्प यांनी चेन मायग्रेशन धोरणाला विरोध केला. ते म्हणाले, हे धोरण वाईट असल्यास त्याचे दुष्परिणाम काय होत असतील याची कल्पनाही न केलेली बरी. परंतु अनेक लोक माझ्याशी सहमत आहेत. देशाचे बहुमत माझ्यासोबत आहे. गुन्हेगार देशात येऊ नयेत अशी नागरिकांची इच्छा आहे. देशाला सहकार्य करू शकत नसलेल्या लोकांना अमेरिकेत प्रवेश नाही. त्यासाठी आमचे धाेरण खूप सक्तीचे आहे. 

बातम्या आणखी आहेत...