आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इसिसचे आठवडाभरात समूळ उच्चाटन : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - इस्लामिक स्टेटचे (आयएसआयएस) इराक व सिरियात आठवडाभरात समूळ उच्चाटन होईल, असा विश्वास अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. आपल्या प्रशासनाने दहशतवादी संघटनेच्या क्रूर विचारसरणीचा सामना करावयाचे ठरवले आहे, याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी या वेळी केला. इराक व सिरियात इसिसच्या ताब्यात केवळ १ टक्का जमीन आहे, असा दावा करण्यात आला आहे. गेल्या वर्षी इसिसविरुद्ध लढा पुकारण्यासाठी जागतिक आघाडी उघडण्यात आली. असे असले तरी इसिसचे अफगाणिस्तान, लिबिया, सिनाई व पश्चिम आफ्रिकेतील काही भागांवर अद्यापही नियंत्रण आहे. ट्रम्प यांनी इसिसचा नाश केल्याचा दावा केला आहे. 

 

सिरिया आणि इराकमध्ये इसिसच्या नियंत्रणात असलेला जवळपास सर्व भाग अमेरिका व त्याच्या सहकारी फौजांनी परत मिळवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात अधिकृत घोषणा करण्यात येईल. 

 

दोन वर्षांत २० हजार मैल जमीन ताब्यात घेतली 
इसिसविरोधातील आघाडीतील ८० देशांचा सहभाग 

इसिसविरोधात जागतिक आघाडीतील बैठकीसाठी ८० देशांचे मुत्सद्दी संरक्षण विभागात एकत्र आले होते. इसिसने आपल्या कारवाया वाढवल्यानंतर जागतिक आघाडी आकारास आली. ट्रम्प म्हणाले, आपल्या प्रशासनाने स्वीकारलेल्या धोरणामुळे अमेरिकी कमांडर्सना अधिकार दिले. गेल्या दोन वर्षांत अमेरिका व सहकारी देशांनी २० हजार मैल जमीन परत ताब्यात घेतली. 

 

ट्रम्प यांच्याकडून डेव्हिड मालपास यांची वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदासाठी नामांकन 
वॉशिंग्टन । अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेव्हिड मालपास यांची वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदासाठी नामांकन दिले आहे. जागतिक बँकेच्या संचालकांनी डेव्हिड यांच्या नियुक्तीस मंजुरी दिल्यास ते जिम योंग किम यांची जागा घेतील. ट्रम्प यांनी नामांकन जाहीर करताना सांगितले की, डेव्हिड या पदासाठी अत्यंत योग्य व्यक्ती आहेत. जागतिक बँकेत अमेरिकेचे सर्वात मोठे योगदान आहे. दरवर्षी त्यांच्याकडून १ अब्ज डॉलर निधी दिला जातो. डेव्हिड मालपास यांच्या नियुक्तीतून ट्रम्प प्रशासन चीनचा वाढता प्रभाव मिटवण्याचा प्रयत्न होईल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. मालपास सुधारक म्हणून छाप सोडतील, अशी आशा व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

 

इसिसच्या साठवर नेत्यांना नष्ट केले : ट्रम्प म्हणाले, आम्ही एक रणक्षेत्र जिंकले आहे. आम्हाला एकामागून एक विजय मिळत असून मोसूल व राकावर पुन्हा नियंत्रण प्रस्थापित केले आहे. आम्ही इसिसच्या साठवर नेत्यांना नष्ट केले आहे. मात्र, ते पुन्हा एकत्र येत आहेत. त्यांना यानंतर यश मिळणार नाही. इसिसच्या साधारण शंभरवर अधिकाऱ्यांचेही उच्चाटन करण्यात आले आणि हजारो अतिरेक्यांनी पलायन केले आहे. 

 

इसिसच्या तावडीतून ५ लाख लोकांची सुटका 
ट्रम्प यांनी डिसेंबरमध्ये सिरियातून अमेरिकी फौजा माघारी घेण्याची घोषणा केली होती. यामुळे संरक्षण मंत्री जिम मॅटिस आणि सिरिया व इराकमधील अमेरिकेचे विशेष दूत ब्रेट मॅक्गर्क यांनी राजीनामा दिला. अमेरिकेच्या गैरहजेरीत इसिस पुन्हा नियंत्रण मिळवेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इसिसच्या तावडीतून पाच लाख लोकांची सुटका केल्याचा केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...