आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. सोमवारी संध्याकाळी ट्रम्प आपली पत्नी मेलानियासोबत आग्र्याला ताजमहल पाहण्यासाठीदेखील जाणार आहेत. ट्रम्प अमेरिकेचे तीसरे असे राष्ट्रपती असतील, जे ताजमहल पाहायला जातील. त्यांच्याआधी 1959 मध्ये ड्वाइट आयजनहॉवर आणि 2000 मध्ये बिल क्लिंटन आग्र्याला आले होते. ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी आग्र्यामध्येही विशेष व्यवस्था केली गेली आहे. जेव्हा आयजनहॉवर आग्र्याला आले होते, तेव्हा येथे ओपन कार मध्येच तत्कालीन पंतप्रधान जवाहर लाल नेहरूयांच्यासोबत फिरले होते. त्यांच्यासोबत त्यावेळी भारत आणि अमेरिकेचे निवडक सुरक्षारक्षकच होते. मग जेव्हा बिल क्लिंटन ताजमहलला गेले, तेव्हा आग्र्याच्या रस्ते आणि फुटपाथदेखील रिकामे करून घेतले होते.
दिल्लीमध्ये ओपन जीपमध्ये फिरले होते आयजनहॉवर...
आयजनहॉवर भारतात येणारे पहिले अमेरिकेचे राष्ट्रपती होते. ते 9 ते 14 डिसेंबर 1959 ला 6 दिवशीय भारत दौऱ्यासाठी आले होते. असे म्हणाले जाते की, आयजनहॉवरच्या स्वागतात दिल्लीच्या रस्त्यावर 10 लाख लोक जमले होते. आयजनहॉवर जेव्हा भारतात आले होते तेव्हा नेहरू यांनी ‘प्रिंस ऑफ पीस’ म्हणून त्यांचे स्वागत केले होते. भारतात येताच ते राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासोबत ओपन जीपमध्ये फिरले. दौऱ्यामध्ये त्यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले होते. त्यानंतर आग्रा भेटीला गेले होते, तेव्हाही ते ओपन कारमध्ये पंडित नेहरू यांच्यासोबत प्रवास केला. आयजनहॉवर यांच्यासाठी कॅडिलेक कार आली होती. जेव्हा ते दिल्ली आणि आग्र्याच्या रस्त्यांवर निघाले तेव्हा दोन्ही बाजूला त्यांच्या स्वागतासाठी लोक उभे होते.
2000 मध्ये बिल क्लिंटन आग्र्याला आले होते, तेव्हा धाःरातील अर्धे रस्ते रिकामे केले गेले होते...
आयजनहॉवरक यांच्या आग्रा दौऱ्याच्या 40 वर्षानंतर अमेरिकेचे 42 वे राष्ट्रपती बिल क्लिंटन येथे आले. ते 19 ते 25 मार्च 2000 पर्यंत भारत दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी दिल्ली, आगरा, जयपुर, हैदराबाद आणि मुंबईचा दौरादेखील केला होता. क्लिंटन मुलगी चेल्सीसोबत ताजमहलला गेले होते. त्यांच्या दौऱ्यासाठी आग्र्याचे अर्धे अधिक रस्ते रिकामे करून घेतले होते. त्यांच्या सुरक्षेत 5 हजारपेक्षा जास्त कॉन्स्टेबल, पॅरामिलिट्री फोर्सच्या 22 कंपन्या, रॅपिड एक्शन फोर्सचे जवानदेखील तैनात होते. जेथुनही क्लिंटन गेले, तेथिल फुटपाथदेखील लोकांना चालायला मनाई होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.