आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Donald Trump Threatens National Emergency In US Over Mexico Wall

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शट डाऊननंतर आता ट्रम्प यांनी दिली अमेरिकेत आणीबाणी लागू करण्याची धमकी; मेक्सिको सीमेवर भिंत उभारणारच!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिगटन - आधीच शट डाऊनची मार सहन करणाऱ्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणीबाणी लागू करण्याची धमकी दिली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या भिंतीसाठी आग्रही आहेत. परंतु, विरोधी डेमोक्रेटिकच्या खासदारांनी त्यांना संसदेत या मुद्द्यावर समर्थन देण्यास स्पष्ट नकार दिला. कुठल्याही परिस्थितीत मेक्सिको-अमेरिका सीमेवर भिंत उभारणारच आहे. एवढेच नव्हे, तर शटडाऊनचा तिसरा आठवडा सुरू असताना हीच परिस्थिती वर्षभर ठेवण्याचा इशारा सुद्धाव ट्रम्प यांनी दिला आहे.


22 डिसेंबरपासून 8 लाख कर्मचारी वेतनापासून वंचित
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याच भिंतीच्या आग्रहासाठी देशात शटडाऊन जाहीर केला आहे. शटडाऊन लागू असल्याने सरकारी कर्मचारी आणि प्रशासकीय खर्चावर अंकुश लागला आहे. अशात 22 डिसेंबरपासून 8 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वेतन नाही. विरोधकांनी मेक्सिको भिंतीच्या निधीसाठी संसदेत मांडलेल्या विधेयकाला मंजुरी दिली नाही तर शटडाऊन वर्षभर असाच राहील असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिला आहे. या गतिरोधावर तोडगा काढण्यासाठी डेमोक्रेटिकच्या वरिष्ठ खासदारांनी राष्ट्राध्यक्षांसोबत पुन्हा बैठक आयोजित केली आहे.

 

मला माझ्या निर्णयावर गर्व -ट्रम्प
तत्पूर्वी शुक्रवारी रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रेटिक खासदारांसोबत बैठक घेतली. 90 मिनिटे चाललेली ही बैठक सकारात्मक ठरल्याचे त्यांनीच जाहीर केले होते. परंतु, भिंतीसाठी आणि भिंतीच्या निधीसाठी संसदेची (काँग्रेस) मंजूरी मिळाली नाही तर काय कराल असा प्रश्न ट्रम्प यांनी पत्रकारांनी विचारला. आपण, राष्ट्राध्यक्षांच्या आपातकालीन स्वविवेकाधीन अधिकार वापरणार का? अशीही विचारणआ केली. त्यावर ट्रम्प म्हणाले, हो नक्कीच. यासाठी देशात आणीबाणी लागू करावी लागली तरीही करेन. कुठल्याही परिस्थितीत मेक्सिको सीमेवर लवकरात लवकर भिंत उभारायची आहे. हाच (आणीबाणी) आमच्याकडे एक पर्याय आहे. ट्रम्प येथेच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, "मी जे काही करतो त्यावर मला गर्व आहे. मी सध्या सुरू असलेल्या परिस्थितीला शटडाऊन म्हणणार नाही. कारण, जे काही केले ते देशाच्या फायद्याचे आणि सुरक्षेसाठी केले आहे."