आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षेपणास्त्र करारावरून डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी; आमचा निर्णय भारताला लवकरच कळेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- रशियासोबत भारताने केलेल्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या करारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी दिली आहे. भारताला निर्बंधाबाबत लवकरच कळेल, असे ट्रम्प यांनी सूचकपणे म्हटले आहे. 


ट्रम्प म्हणाले, इराणसोबत ४ नोव्हेंबरनंतर तेल आयात सुरूच ठेवणाऱ्या देशांना अमेरिका पाहून घेईल. इराणवर निर्बंध लागू करण्यात आलेले असतानाही ते सुरू आहे. भारत व चीनसारखे देश इराणकडून तेल आयात करतात. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, आम्ही पाहून घेऊ. रशियासोबत संरक्षण करार केल्यानंतर अमेरिकेने चीनवर काट्सा अर्थात काउंटरिंग अमेरिकाज अॅडव्हर्सरिज थ्रू सँक्शन्स कायद्यांतर्गत निर्बंध लागू केले आहेत. अमेरिकेच्या निर्बंधातून सूट देण्याचा अधिकार केवळ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे आहे. मात्र त्याबद्दलची आशा धूसर दिसू लागली आहे. कारण अमेरिका या मुद्द्यावर नरमाईचे धोरण स्वीकारेल, असे वाटत नाही, असे जाणकारांना वाटते. संरक्षणाच्या दृष्टीने रशिया-भारत यांच्यातील संरक्षण करार अमेरिकेस खूप महत्त्वाचा वाटतो. 

 

या तीन कारणांमुळे अमेरिका निर्बंध लावण्यास धजावत नाही 
- अमेरिका भारताला काट्साच्या निर्बंधातून सूट देईल. कारण भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार आहे, अशा शब्दांत अमेरिकेतील फ्रेंड्स ऑफ इंडिया या संघटनेने आशा व्यक्त केली आहे. 
- अमेरिका- भारत यांच्यात अब्जावधी डॉलर्सचा करार होऊ घातला आहे. निर्बंध लादल्यास संरक्षण करार रद्द होऊ शकतो.

- चीनचा वाढता दबदबा हा डोकेदुखी असून चिनी हस्तक्षेप रोखण्यासाठी अमेरिकेला भारतासोबत भागीदारी गरजेची वाटते.


मी टू मोहिमेची ट्रम्प यांनी उडवली खिल्ली, म्हणाले-माध्यमांच्या नियमांमुळे गप्प 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लैंगिक शोषणाच्या विरोधात सुरू असलेल्या 'मी टू' मोहिमेची खिल्ली उडवली. माध्यमांच्या नियमांमुळे मला स्वत: वर नियंत्रण ठेवावे लागत आहे. पेन्सिल्व्हिनियामध्ये मध्यावधी निवडणुकीसंबंधी एका जाहीर सभेत ट्रम्प यांनी ' द गर्ल दॅट गॉय अवे' या म्हणीकडे लक्ष वेधले. परंतु ही म्हण वापरण्याची मुभा मला आता नाही. प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला सोडून निघून गेली आहे. तुमचेही तिच्यावर तितकेच प्रेम होते. ती सोडून गेल्यानंतरही तो तिच्यावर प्रेम करतो, असे सांगण्यासाठी 'द गर्ल दॅट गॉट अवे' या म्हणीचा वापर केला जातो, असे ट्रम्प यांनी सांगितले.


हेली यांच्यावर स्तुतिसुमने उधळली, खासगी क्षेत्रात नावलौकिक मिळवतील : ट्रम्प 
संयुक्त राष्ट्राच्या राजदूत पदाचा राजीनामा देणाऱ्या निकी हेली यांच्यावर ट्रम्प यांनी स्तुतिसुमने उधळली आहेत. आता हेली खासगी क्षेत्रात आणखी नावलौकिक व संपत्ती कमावतील, असे ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसच्या कार्यक्रमात सांगितले. निकी वर्षाखेरपर्यंत येथे राहतील. त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते आहे. व्यक्ती म्हणून त्या चांगल्या आहे. निकी हॅले चांगल्या भूमिकेसाठी पुन्हा परत येतील, अशा शब्दांत ट्रम्प यांनी भावना व्यक्त केल्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात कॅबिनेट पदापर्यंत मजल मारणाऱ्या त्या पहिल्याच भारतवंशीय अमेरिकी असून मंगळवारी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. 

बातम्या आणखी आहेत...