आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Donald Trump Tweets Doctored Image As 'Rocky' Film Of Sylvester Stallone, Trump Shares His Photo On Sylvester Stallone's Body, Users Say Preparations For Battle

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीच केली ही फोटो एडिटिंग, ट्विटरवर सुद्धा केले अपलोड

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - सोशल मीडियावर सर्वांचे लाडके असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोशॉप केलेल्या इमेज नेहमीच व्हायरल होतात. परंतु, यावेळी खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःचा एक फोटो एडिट केला. आणि तो ट्वीट देखील केला आहे. यामध्ये त्यांनी हॉलिवूड अॅक्शन स्टार सिल्वेस्टर स्टॅलोनच्या शरीरावर स्वतःचा चेहरा लावला आहे. हा फोटो सिल्वेस्टरचा 1982 मध्ये आलेल्या 'रॉकी-3' चा पोस्टर फोटो आहे. यावर ट्रम्प यांनी काहीच कॅप्शन दिले नाही. व्हाइट हाउसने सुद्धा यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

सिल्वेस्टरचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सिल्वेस्टर स्टॅलोनचे फॅन आहेत. 2016 मध्ये राष्ट्रपती निवडणुकीचा प्रचार सुरू असताना ट्रम्प यांनी हा खुलासा केला होता. ट्रम्प यांचे ट्विट पाहून जगभरात त्यांना ट्रोल केले जात आहे. यात एका युजरने लिहिले, "ट्रम्प आभार मानणाऱ्यांसाठी लढण्याची तयारी करत आहेत." दुसऱ्या एका युजरने कार्टून 'सिम्पसन'सोबत ट्रम्प यांची तुलना करताना एक फोटो देखील शेअर केला. या कार्टूनमध्ये सुद्धा सिम्पसन आपली बॉडी आरशात पाहताना दिसून येतो. विशेष म्हणजे, सिम्पसन कार्टूनमध्ये दाखवण्यात आलेल्या अनेक घडामोडी ट्रम्प यांच्या खऱ्या आयुष्याशी हुबेहूब जुळतात. त्यातही महत्वाचे म्हणजे, हे कार्टून आधी प्रसिद्ध झाले आणि ट्रम्प यांच्या आयुष्यात तशाच घडामोडी घडून आल्या आहेत.

मला डॉक्टरांनी असे करण्यास सांगितले होते -ट्रम्प

नुकतेच माध्यमांमध्ये एक वृत्त प्रसारित करण्यात आले होते. त्यामध्ये ट्रम्प यांना हृदयविकाराचा झटका बसला असून ते हृदयरोगाला सामोरे जात असल्याचे सांगितले होते. परंतु, मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी हे वृत्त फेटाळून लावले. मॅरीलँडच्या वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमध्ये डॉक्टरांची त्यांची तपासणी केली होती. डॉक्टरांनी मला शर्ट काढून छाती दाखवण्यास सांगितले होते असा उपहास ट्रम्प यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...