आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिकाे सीमेवरील भिंतीसाठी निधी मंजूर न झाल्याने ट्रम्प संतप्त ; म्हणाले, ही बैठक म्हणजे वेळ वाया घालवणे हाेय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाॅशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प हे मेक्सिकाे सीमेवर भिंत उभारण्याच्या पार्श्वभूमीवर देशातील शटडाऊनची स्थिती संपवण्यासाठी बाेलावलेली बैठक मध्येच साेडून निघून गेले. या बैठकीत मेक्सिकाे सीमेवरील भिंतीसाठी निधी मंजूर न झाल्याने नाराज हाेत ट्रम्प यांनी ही बैठक अर्ध्यातच साेडली. याबाबतची माहिती स्वत: ट्रम्प यांनी टि्वट करून दिली आहे. 

 

ही बैठक डेमाेक्रॅटिकच्या नेत्या नॅन्सी पेलाेसी व चक शूमर यांच्यासाेबत आयाेजित करण्यात आली हाेती. मात्र, 'ही बैठक म्हणजे वेळ वाया घालवण्याशिवाय दुसरे काही नव्हते. मेक्सिकाे सीमेवरील भिंतीसाठी आपण पुन्हा काम सुरू केल्यास येत्या ३० दिवसांत भिंत व त्यासाठी लागणाऱ्या इतर साहित्यासह सीमा सुरक्षेला तुम्ही मंजुरी द्याल का? असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर पेलाेसी यांनी 'नाही' असे उत्तर दिले. त्यामुळे मी बैठक साेडून निघून आलाे. कारण याबाबत दुसरे काही केले जाऊ शकत नाही' असे ट्रम्प यांनी त्यांच्या टिवटमध्ये म्हटले आहे. दुसरीकडे पेलाेसी व शूमर यांनी सांगितले की, मेक्सिकाे सीमेवरील भिंतीसाठी निधीची व्यवस्था करण्यास डेमाेक्रॅटिकचे नेते काेणत्याही स्थितीत तयार नाहीत. तसेच पक्षदेखीलआपल्या भूमिकेवर ठाम आहे. दरम्यान, या भिंतीसाठी ३५ हजार काेटी रुपयांची व्यवस्था केली जावी, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. मात्र, डेमाेक्रॅटिकच्या नेत्यांना याची आवश्यकता वाटत नाही. या मुद्द्यावर ख्रिसमसपूर्वी सहमती न झाल्यापासून सरकारी खर्चाचे विधेयकही पारित हाेऊ शकलेले नाही. याच कारणामुळे अमेरिकेत अंशत: कामबंदी (शटडाऊन) सुरू आहे. त्यातच ट्रम्प यांनी विराेधी पक्षांनी भिंतीच्या निधीसाठी सहमती न दर्शवल्यास राष्ट्रीय आणीबाणी घाेषित करण्याची धमकीही दिली आहे. अमेरिकेत अवैधरीत्या प्रवेश करणाऱ्यांना राेखण्यासाठी भिंत उभारण्याची ही याेजना काेणत्याही स्थितीत पूर्ण केली जाईल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. 

 

ट्रम्प यांच्या भूमिकेला भारतवंशीय खासदारांचा विराेध 
अमेरिकेतील दाेन भारतवंशीय खासदार कॅलिफाेर्नियाचे डेमाेक्रॅट राे खन्ना व कमला हॅरीस यांनी ट्रम्प यांच्या अडेलतटटू भूमिकेचा विराेध केला आहे. याबाबतच्या टिवटमध्ये खन्ना यांनी म्हटले आहे की, शटडाऊनमुळे प्रत्येक अमेरिकी नागरिकावर अयाेग्य प्रभाव पडत आहे. ८ लाख कर्मचाऱ्यांची स्थिती वाईट झाली आहे. त्यामुळे यास मंजूर केले जाऊ शकत नाही. तसेच शटडाऊनच्या स्थितीला स्वत: ट्रम्प हेच कारणीभूत असल्याचा ाराेप हॅरीस यांनी केला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...