आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई चक्क एका लग्न समारंभासाठी आले भारतात..नेमके काय होते कनेक्शन पाहुयात सविस्तर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैसलमेर- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि त्यांचे जेष्ठ सल्लागार  जेरेड कुशनर सध्या जैसलमेर येथे आहेत. ते येथे त्यांचे NRI स्नेही नितीन सैगल यांच्या विवाहासाठी आले आहेत. नितीन सैगल हे अमेरिकेत मोठे उद्योजक आहेत.  कुशनर आणि नितीन या दोघांनीही हार्वड कॉलेज मध्ये सोबतच शिक्षण घेतले आहे. ते दोघे रूमपार्टनर  देखील होते.

 

दिल्लीतील उद्योगपतीच्या मुलीशी होत आहे नितीन यांचा विवाह...
- माध्यमांच्या अहवालानुसार, दिल्लीतील  रिअल इस्टेट उद्योजक संजय भास्कर यांची मुलगी वेदिकासोबत  नितीन यांचा विवाह होणार आहे.
- अमेरिकेचे प्रतिनिधी मंडळ 24 नोव्हेंबर पर्यंत  कुशनर यांच्या सोबत जैसलमेर येथे असेल, तर कुशनर हे 25 नोव्हेंबर रोजी परतणार आहेत.

-  या हाय प्रोफाइल लग्न समारंभात कुशनर यांची पत्नी म्हणजेच ट्रम्प यांची कन्या इवांका ही देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

कोण आहेत नितीन आणि वेदिका?
- माध्यमांच्या अहवालानुसार संजय भास्कर यांची मुलगी वेदिका ही  लक्झरी होम फर्निशिंग ब्रँड Ishatvam ची व्हाईस प्रेसिडेंट आहे.
- तर नितीन यांनी मुंबई येथील कॅथेड्रल अँड जॉन कॅनॅन येथे शालेय शिक्षण घेऊन अमेरिकेतील हावर्ड कॉलेज मधून BA  केले आहे. त्यानंतर हावर्ड बिझनेस स्कुल मधून MBA पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
-  अमेरिकेत कोरा मॅनेजमेंट कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य गुंतवणूक आधीकरी होण्याआधी नितीन न्यूयॉर्क येथे ब्लॅक स्टोन ग्रुप मध्ये विश्लेषक म्हणून कार्यरत होते. 

 

कुशनर यांच्या सुरक्षेसाठी विमानतळावर उपस्थित होते २० अमेरिकन सुरक्षारक्षक....
- जगातील सर्वात मोठ्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचे जावई गुरुवारी एका चार्टर्ड बोईंग विमानाने जसैलमेर येथे पोहचले. तेथून लगेचच लग्नसमारंभात उपस्थित राहण्यासाठी सूर्यगड हॉटेल मध्ये जाण्यासाठी निघाले
- ट्रम्प यांचे जावई असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी जैसलमेर विमानतळापासून लग्नसमारंभाच्या ठिकाणापर्यंत कडक सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात अली होती.
- जैसलमेर एरपोर्टवर तर  जवळपास १०० भारतीय सुरक्षारक्षकांबरोबर २० पेक्षा अधिक अमेरिकन सुरक्षारक्षक होते.   

 

बातम्या आणखी आहेत...