Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Donated ten lakhs; But what about liveliness?

दहा लाखांची मदत दिली; पण उदरनिर्वाहाचे काय? राईनपाडा हत्याकांडातील कुटुंबियांचे गाऱ्हाणे

प्रतिनिधी | Update - Sep 04, 2018, 09:33 AM IST

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील हत्याकांडात मरण पावलेल्या कुटुंबियांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालीच नाही. मुख्यमंत

  • Donated ten lakhs; But what about liveliness?

    सोलापूर- धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील हत्याकांडात मरण पावलेल्या कुटुंबियांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालीच नाही. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. मयतांच्या कुटुंबियांना १० लाख रूपयांची मदत मिळाली पण उदरनिर्वाह व पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही दुर्लक्षित राहिला आहे. याबाबत मृताच्या कुटुंबातील सदस्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी केली.


    राईनपाडा येथे भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या मंगळवेढ्यातील चार भिक्षुकांची जमावाने हत्या केली होती. घटना घडल्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी कुटुंबियांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांशी संवाद घडवून आणला. नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी घटनेचा तीव्र निषेध करीत मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहिर केली. मृताच्या कुटुंबियांना १० लाखांची तत्काळ मदत, उदरनिर्वाहासाठी जमीन, कुटुंबातील एकास नोकरी, घरकुल देण्याचे आश्वासन दिले. नाथपंथी डवरी गोसावी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे पुनर्वसन करण्याची घोषणा केली होती. यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास आल्याचे मृताच्या कुटुंबियांनी सांगितले. मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले, पण त्याची पूर्तता करण्याबाबत कोणीही लक्ष देत नाही. जिल्हा प्रशासनाने आमची मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवावी, अशी अपेक्षा भटक्या व विमुक्त जाती संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडे केली आहे.

Trending