आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोंडाईचा घरकुल घोटाळा : माजी मंत्री देशमुख यांना अखेर अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - दाेंडाइचा घरकुल घोटाळाप्रकरणी प्रमुख संशयित तथा माजी कामगार राज्य मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचा जामीन अर्ज व त्यावर स्थगिती असे दोन अर्ज सोमवारी धुळे न्यायालयाने फेटाळले. त्यानंतर सायंकाळी डॉ. देशमुख यांना अटक करण्यात आली. दोंडाईचा घरकुल घोटाळाप्रकरणी सोमवारी धुळे न्यायालयात कामकाज होते. त्यासाठी दोन्ही पक्ष उपस्थित होते. या खटल्यातील सरकारी व बचावपक्षाकडील युक्तिवाद गेल्या तारखेला झाला होता. सोमवारी दुपारी खटल्याचे कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी न्या. एच. आर. उगले यांनी डॉ देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळाला. त्यामुळे डॉ. देशमुख यांच्या वतीने दुसरा अर्ज दाखल करण्यात आला. अंतरिम जामीनसाठी उच्च न्यायायात जाण्यासाठी या आदेशाला स्थगिती द्यावी असा हा अर्ज होता. परंतु हा अर्जही फेटाळून लावण्यात आला. सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास दाेन्ही अर्ज फेटाळल्यानंतर डॉ देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर डॉ. देशमुख यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात आणले. या वेळी त्यांच्यासोबत समर्थकही होते. रात्री वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना नेण्यात आले. यानंतर रात्री त्यांच्या अटकेची नोंद करण्यात आली. पुढील सुनावणी लवकरच होणार आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...