आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला वा बायकोला तिकीट देण्याचा आग्रह नकोच; तिकिटाचा आशीर्वाद मागणाऱ्यांना गडकरींच्या कानपिचक्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात उमेदवारीचा आशीर्वाद मागणारे वाढले आहेत. भाजपमध्ये उमेदवारीच्या तिकिटासाठी कोटा सिस्टीम नाही. तिकिट कोणाला द्यायचे, हे पक्षच ठरवणार. पक्षाचे हित, जनतेचा विचार आणि कार्यकर्त्याचे काम पाहूनच तिकीट दिले जाणार. त्यामुळे ज्यांना तिकीट मिळेल, त्यांच्यामागे कार्यकर्त्यांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. येथेच कार्यकर्त्यांची परीक्षा असून मला तिकीट मिळाले नाही तर किमान मुलाला अथवा बायकोला तिकीट द्या, अशी मागणी करू नका, या शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. 

भाजपच्या विदर्भ प्रदेश विजय संकल्प मेळाव्यातील भाषणात गडकरी यांनी प्रामुख्याने तिकिटेच्छूक कार्यकर्त्यांच्या प्रवृत्तीवर भाष्य करताना तिकिट न मिळालेल्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा मोठा अनुभव आपल्याकडे असल्याचे सांगितले अन् सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. पक्षात आज माझ्यापेक्षाही अधिक काम केलेले कार्यकर्ते आहेत. पक्षात काहीच न मिळालेल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. आज सर्वत्र भाजपची सत्ता आहे. त्याचे श्रेय पक्षासाठी खस्ता खाणाऱ्या कार्यकर्त्यांना आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
 

भाजप-शिवसेना युती होईल असे वाटते
भाजप-शिवसेना युती होणार की नाही, यावरून राजकीय वातावरण तापलेले असताना गडकरी यांनी उपरोधिक स्वरात ‘युती होईल असे वाटते,’ असे सांगितल्यावर सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. गडकरी यांना नेमके काय म्हणायचे होते, यावरून नंतर कार्यकर्त्यांमध्ये बरीच चर्चा होती.
 

साहेब, आता शेवटचे तरी तिकीट द्या
तिकीट मागताना साहेब शेवटचे तिकीट द्या, अशी विनवणी कार्यकर्ते करतात. दुसऱ्या वेळी पुन्हा तिकीट मागायला तयार होतात. मला नाही तर किमान मुलाला, बायकोला तिकिटाची मागणी करतात. पण, भाजपमध्ये असे होत नाही. समझने वाले को इशारा काफी है..असे गडकरी म्हणाले.