आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कोरोना’चा बाऊ करू नका, पर्यायी साधने तयार ठेवा!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील कोरोनाची पहिली रुग्ण, त्रिस्सूरमध्ये राहणारी मुलगी अजूनही जानेवारीत सुरू झालेली ती कठीण परीक्षा विसरलेली नाही. याचा अर्थ असा नव्हे की, तिने अभ्यासाकडे दुर्लक्ष केले. ती सकाळी खूप लवकर उठते. ती आठवड्यातील पाच दिवस पहाटे साडेपाचपासूनच व्यस्त असते. ही २० वर्षीय मेडिकलची विद्यार्थिनी ऑनलाइन आपल्या चिनी शिक्षकांशी संपर्क करते. जगभरातील तिचे अनेक सहकारी सेमिस्टर कोर्स असाच मिळून पूर्ण करत आहेत. कोरोनाचा फैलाव चीनच्या वुहानपासून सुरू झाला. याच शहरात तिचे वैद्यकीय कॉलेज. कोरोनाच्या भीतीमुळे ते बंद करण्यात आले. ही भीती आता खूप दूरवर पसरली आहे. पुण्यातील एक सीबीएसई शाळा व्हर्च्युअल क्लासरूमची तयारी करत आहे. परिस्थिती बिघडल्यास शाळा पालकांना व्हॉट्सअॅप व्हिडिओ पाठवणार आहे. पालकांनी याचे स्वागत केले आहे. बहुधा आता जास्त घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही. मात्र, देशभरातील शाळा कोरोनाशी दोन हात करण्यासाठी तयारी करत आहेत. स्वच्छतेचे नवे नियम जारी करण्यात आले आहेत. पुण्यातील अनेक शाळा परिस्थिती आणखी बिघडल्यास व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्याच्या बेतात आहेत. काही शाळांनी मुलांना एन-९५ मास्क घालण्यास आणि समवेत अल्कोहलबेस्ड सॅनिटायझर ठेवण्यास सांगितले आहे. काही शाळांनी स्टाफला प्रशिक्षण देऊन फ्लूची लक्षणे दिसणारी मुले ओळखण्याची जबाबदारी दिली आहे. गर्दी असणारा कार्यक्रम बहुतेक शाळा आयोजित करण्याचे टाळत आहेत. मात्र, आर्यन्स स्कूल एक पाऊल पुढे आहे. ही महामारी पाहून प्रायमरी सेक्शनच्या परीक्षा मार्चमध्येच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ती एप्रिलमध्ये होते. शैक्षणिक सत्र संपल्यानंतर मिळणारी सुटी रद्द करून लगेच १६ मार्चपासून वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे संकट वाढल्यास एप्रिलमध्ये शाळा बंद ठेवाव्या लागतील ही भीती त्यांना सतावत आहे. शैक्षणिक कटिबद्धता राखण्यासाठी शाळा हे सारे निर्णय घेत आहे. कोरोनामुळे शाळा जास्त दिवस बंद ठेवाव्या लागल्या तर शाळा प्रशासन लाँग डिस्टन्स एज्युकेशनच्या शक्यतेवर गांभीर्याने विचार करत आहे. अशा स्थितीत व्हिडिओद्वारे वा शिक्षकांमार्फत अभ्यासक्रमाचे व्हर्च्युअल क्लास पालकांना व्हॉट्सअॅपवर पाठवण्याची तयारी केली जात आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड नको हा त्यांचा हेतू. शिक्षकांनाही वाटते की हे स्मार्ट क्लासरूम्सचेच व्यापक स्वरूप. या क्लासरूमची लिंक पालकांना पाठवतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना मदत मिळेल. मार्चमध्ये शिक्षक वीकेंड्सलाही काम करत आहेत, कारण अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. आर्यन्स स्कूल सेकंडरी क्लासेस लक्षात घेऊन छोटे-छोटे व्हिडिओ बनवणार आहे. कारण विद्यार्थ्यांकडे साधने असावीत हा हेतू. पालकही शाळांच्या या तयारीचे कौतुक करत आहेत. विद्यार्थी शाळेत जाण्याऐवजी, शाळाच मुलांच्या घरी येत आहेत. यासाठी शाळा जे तंत्रज्ञान अवलंबत आहेत, त्याचेही कौतुक होत आहे.  

फंडा असा : विनाकारण जास्त घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, समस्येचा वाढता धोका पाहता पर्याय म्हणून प्लॅन बी वा प्लॅन सी तयार ठेवण्यास काहीच हरकत नाही.

बातम्या आणखी आहेत...