आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पूर-पावसानंतर पडू नका स्वस्त कारच्या नादात, होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या कसे कराल चेक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क -  आगामी काळात पुरात अडकलेल्या कार सेकंड हँड कार बाजारात विक्रीस येतील. जर तुम्ही दिवाळीच्या आसपास सेकंड हँड कार खरेदी करण्याचे नियोजन करत असाल तर या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या... 

वासामुळे उघड होईल रहस्य 
पाण्यात बुडालेल्या कारमध्ये पाण्याचाच वास असतो. डीलर तो लपवण्यासाठी परफ्यूमचा वापर करतात, पण प्रत्येक कोपऱ्यात श्वास घेतल्यास हा वास येईल. 
 

ओलेपणा शोधा 
मॅट वर करून कार्पेटचा ओलेपणा शोधा. कार्पेट पाण्यात भिजते तेव्हा कारमधून बाहेर काढल्याशिवाय सुकवले जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याचे कोपरे उंच होतात. 

डिकी जरूर उघडा 
डॅमेज कारच्या बूटमध्ये पाण्याच्या खुणा शोधल्या जाऊ शकतात. स्पेअर टायर बाहेर काढून खालचे मटेरियल पाहा. जॅक, जॅक हँडल आणि टूल किट तपासा. गंजल्याच्या खुणा दिसत असल्या तर काही गडबड आहे. जेव्हा स्पेअर व्हीलच्या जागी पाणी जमा होते तेव्हा ते काढणे सोपे नसते. डीलर ती जागा चमकवणे बहुधा विसरतात. 

गंज शोधा, अपहोल्स्ट्री तपासा 
बॉनेटमधील नट-बोल्ट्स तपासा, त्यात गंज असणे योग्य नाही. दरवाजे, बोनट, डिकीच्या कोपऱ्यात गंज असतो. नवी अपहोल्स्ट्री असेल किंवा नवे सीट कव्हर असेल तर कव्हर हटवून ओरिजनल सीट तपासा. पाण्यामुळे सर्वात जास्त नुकसान सीटचेच होते. सीटचा खालचा भाग पाहा. 

इलेक्ट्रॉनिक्स जरूर तपासा 
पाण्यामुळे खराब झालेले इलेक्ट्रॉनिक्स ओळखणे सोपे आहे, कारण बहुतांश वेळी ते काम करणे बंद करते. डॅशबोर्ड््सचे लाइट सुरू आहेत की नाहीत हे इग्निशन सुरू करून पाहा. हेडलाइट्स, टेललाइट्स, इंडिकेटर्समध्येही पाणी घुसू शकते. सीपेजच्या खुणा दिसतात. 

0