आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मला 'हिंदूहृदयसम्राट' म्हणू नका', मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मनसैनिकांना कडक सूचना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनसेच्या महाअधिवेशनात मनसैनिकांनी राज यांना 'हिंदूहृदयसम्राट' ही उपाधी दिली होती

मुंबई - 'हिंदूहृदयसम्राट' म्हणू नका, अशा कटक सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेचे महाअधिवेशन पार पडले. या कार्यक्रमात मनसैनिकांनी राज ठाकरेंना ‘हिंदूहृदयसम्राट’ही उपाधी दिली. त्यानंतर राज यांनी कडक शब्दात आपल्या कार्यकर्त्यांना ही उपाधी न देण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदराने ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हटले जाते. फक्त शिवसैनिकच नाही, तर सर्वपक्षीयांनी बाळासाहेबांना ही उपाधी बहाल केली आहे. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या पश्चात ‘शिवसेनाप्रमुख’ हे पद वापरण्यास नकार देत पक्षप्रमुख हे पद घेतले, त्याचप्रमाणे राज ठाकरेही ‘हिंदूहृदयसम्राट’ या पदाचा मान आणि आदर राखत ‘आजचे हिंदूहृदयसम्राट’ किंवा ‘नवे हिंदूहृदयसम्राट’ हे पद धारण करण्यास विनम्र नकार दर्शवला आहे.

मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतून फक्त दहा मिनिटांत चर्चा आटोपून राज ठाकरे निघाले. मनसे नेत्यांना पुढील सूचना देण्यास राज ठाकरेंनी सांगितलं. ‘सीएए’ कायद्याच्या समर्थनार्थ मनसेने 9 फेब्रुवारीला आयोजित केलेला मोर्चा यशस्वी झाला पाहिजे, अशा सूचनाही राज यांनी दिल्या आहेत. बैठकीला बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, आमदार राजू पाटील, अमेय खोपकर, अभिजीत पानसे यासारखे नेते उपस्थित होते. मनसेचे राज्यातील सरचिटणीस, उपाध्यक्ष, विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख उपस्थित होते.
 

बातम्या आणखी आहेत...