आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासात दागिने नेऊ नका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घटना 2009 मधील आहे. बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्टवर आम्ही तिघी बहिणी, माझे मिस्टर आणि मेहुणे सर्वजण सकाळी नऊ वाजता उतरलो. माझ्या मुलाच्या फ्लॅटची वास्तुशांती होती, त्यानिमित्ताने आम्ही तेथे गेलो होतो. एअरपोर्टवरून त्याच्या घरी जाण्यास व्हॉल्व्हो बसने निघालो. बसथांब्यावर थांबल्यानंतर आम्ही दोघे सामान घेऊन खाली उतरलो. तितक्यात बस पुढे निघून गेली आणि माझी सुटकेस बसमध्येच राहिल्याचे लक्षात आले. माझा मुलांशी संपर्क होताच, त्याला सुटकेस बसमध्ये विसरल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘बाबा, इतर नातेवाइकांना घेऊन घरी जातील, येथून पाच मिनिटांच्या अंतरावर आपले घर आहे.’ त्यानंतर मी आणि माझा मुलगा सचिन त्याच्या टाटा सफारीतून बसचा पाठलाग करत होतो.

काही अंतर गेल्यावर ती बस दिसू लागली. जेव्हा इलेक्ट्रॉनिक सिटीत गेलो तेव्हा बस दिसेनाशी झाली. शेवटच्या स्टॉपवर चौकशी केली असता, तेथील वॉचमनने सांगितले, बस अद्याप आलीच नाही. ती व्हॉल्व्हो बस आठ नंबर इलेक्ट्रॉनिक सिटीत न जाता तशीच परत फिरली. मला रडूच येऊ लागले. त्या सुटकेसमध्ये साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम होती. मुलाला याची कल्पना दिल्यावर त्याने धीर दिला. घाबरू नको, आपण बसला नक्कीच शोधून काढू. माझा मुलगा सचिनने वॉचमनला इंग्रजीतून काही सूचना केल्या. त्याने त्या ड्रायव्हरचा मोबाइल नंबर दिला. ड्रायव्हरला फोन लागल्यानंतर त्याने सुटकेस बसमध्येच असल्याचे सांगितले. तेव्हा मला थोडे हायसे वाटले. आम्ही बसच्या पाठलागावर निघालो, पण बस थांबण्याची चिन्हे दिसेनात. अस्वस्थता वाढत चालली. शेवटी ऑफिस शोधले. तेथे बाहेर एका खुर्चीवर एक माणूस बसला होता. त्याला काही विचारणार, इतक्यात कोप-यातील एका बॅगकडे लक्ष गेले. ती माझीच सुटकेस होती. ओळख पटवून सुटकेस ताब्यात घेतली. तेव्हापासून कानाला खडा लावला, सोन्याचे दागिने बॅगमध्ये न्यायचे नाहीत.