आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळात राजकारण नको, पाकशी क्रिकेट व्हायला हवे : हरभजन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- खेळात राजकारण आणायला नको आहे. खेळ हे असे माध्यम आहे, जे सर्व लोकांना एकत्र आणतेेे. भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट झाले पाहिजे. दोन्ही देशांत नाही, तर त्रयस्थ ठिकाण त्यासाठी योग्य ठरू शकते. नुकतीच पाकिस्तानची हॉकी टीम भुवनेश्वरमध्ये विश्वचषक खेळली. इतर खेळांच्या स्पर्धा होतात, तर क्रिकेटच्या का नाही? पाकिस्तानसोबत संबंध ठेवायचे नसतील तर सर्वच गोष्टी बंद केल्या पाहिजेत, असे रोखठोक मत भारताचा स्टार क्रिकेटपटू हरभजनसिंगने व्यक्त केले.   

 

तो व्हेरॉक क्रिकेट स्पर्धेच्या समारोपप्रसंगी शहरात आला असता त्याने माध्यमांशी संवाद साधला. या वेळी व्हेरॉकचे उपाध्यक्ष सतीश मांडे, स्पर्धा सचिव राहुल टेकाळे यांची उपस्थिती होती. सध्या मी क्रिकेटमध्येच आहे. भविष्यात समालोचन हा महत्त्वाचा भाग ठरू शकतो. त्यामुळे हिंदी व इंग्रजी दोन्ही समालोचन करत आहे. जगात इंग्रजी चालती असल्याने त्याकडे लक्ष दिले. टी-२० क्रिकेट हे जगभरात लोकप्रिय झाले आहे. येथे असलेली टी-१० लीग चालणार नाही. ती अत्यंत कमी वेळेची मॅच असल्याने काही मिनिटात संपून जाईल. लोकांना ती आवडणार नाही. माझ्या देशात चार ठिकाणी प्रशिक्षण अकादमी सुरू आहेत. त्यावरदेखील लक्ष देत आहे.  

 

सचिन ‘सचिन’च आहे  
सचिन तेंडुलकर हा जगातील दिग्गज खेळाडू आहे. त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही, कोणी करूही नये. कोहली हादेखील ग्रेट आहे, मात्र मी त्याची सचिनशी तुलना करणार नाही. त्याला भरपूर क्रिकेट खेळायचे आहे. सध्या मी खेळाचा आनंद घेत आहे. आता आयपीएलवर लक्ष देईन. आयपीएलमुळे लोक एकत्र येतात. आनंद घेतात, तो आनंद त्यांना देऊ, असेही भज्जी म्हणाला.

 

ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला विजयाची संधी   
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत भारताला विजयासाठी संधी आहे. ऑस्ट्रेलिया संघ पूर्वीसारखा बलाढ्य राहिला नाही. संघात तीन ते चार बदल झाले पाहिजेत. मुख्य म्हणजे फिरकीपटूंवर जास्त लक्ष द्यायला हवे. गत सामन्यात चुका झाल्या, त्या टाळायला हव्यात. अष्टपैलू रवींद्र जडेजा व कुलदीप यादवला खेळवायला हवे. विराटने आक्रमकपणा कायम ठेवायला हवा. विराटसह यावेळी ऑस्ट्रेलियन माध्यमांदेखील या मालिकेत संयम राखला आहे. 

बातम्या आणखी आहेत...