आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...म्हणून सलाड आणि फळे खाल्ल्यावर पिऊ नये पाणी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फळे किंवा सलाड खाणे चांगली सवय असली तरी अनेकदा लोकांना हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुलणे, जड वाटणे अशी समस्या उद्भवते. यामागील मोठे कारण म्हणजे कच्ची फळे किंवा सलाड खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय. आयुर्वेदानुसारही कच्च्या भाज्या आणि फळांचे सेवन केल्यानंतर पाणी पिणे योग्य नाही. हे खाल्ल्यावर पाणी प्याल्यास ब्लोटिंगची समस्या होते.

पाणी पिऊ नये : फळांमध्ये मोठ्या प्रमाणात शुक्रोज, फ्रुक्टोज आणि यीस्ट असते. फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पाणी आणि अॅसिडचा घोळ पोटात यीस्टसाठी विस्तार होण्यास मदत करतो. परिणामी पोटात गॅस निर्माण होतात आणि पोट फुगते.

अति खाणे टाळा : फळे अति प्रमाणात खाणे टाळावे. सलाड आणि फळे खाल्ल्यानंतर पोटाचा त्रास होण्यामागे अयोग्य प्रमाणात सेवन करणे हे कारण ठरते.

चावून खा : फळांचे सेवन करताना पोटात आढळणारे बॅक्टेरिया सामान्यापेक्षा अधिक वेगाने कार्बन डायऑक्साइडचे निर्माण करू लागतात. ज्यामुळे पोट जड वाटू लागते. तसेच ढेकर येण्याची आणि पोटात गॅस निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे फळे योग्य प्रमाणात आणि चावून चावून खावे.

अतिसाराचा धोका : फळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते आणि फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने अतिसाराचा धोका वाढू शकतो.

बातम्या आणखी आहेत...