आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूरचा संभाव्य धोका नजरेआड नको!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधानांच्या घोषणेनंतर साडेचार महिन्यांतच बिपीन रावत यांनी'सीडीएस'ची जबाबदारी स्वीकारली. त्याला मूर्त स्वरूप येण्यास कारगीलयुद्ध व्हावे लागले. युद्ध समाप्तीनंतरवाजपेयी सरकारने नेमलेल्या 'कारगील रिव्ह्यू कमिटी', मंत्रीस्तरीय समितीने 'सीडीएस'ची आवश्यकता व्यक्त केली होती. त्यानंतरही पद निर्मितीस २० वर्षे लागली. गुप्त माहिती गोळा करणाऱ्या यंत्रणांमधील सुसूत्रतेचा अभाव, मिळालेल्या माहितीचे संकलन, त्याची तिन्ही दलांच्या प्रमुखांमध्येदेवाण-घेवाण, त्यानुसार डावपेचांची आखणी या गोष्टीतताळमेळ नसल्याचे निरीक्षण समितीचे आहे. अमेरिका अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर तालीबानचा धोका आहे. पाकिस्तान, चीन, बांगलादेश यांना खेटून असणाऱ्या सीमांवरनेहमीच तणाव असतो. त्या पार्श्वभूमीवररावत यांच्यावरील जबाबदारी महत्त्वाची आहे. मुशर्रफ यांनी पाकिस्तानमध्ये बंदुकीच्याजोरावर लष्कराने लोकनियुक्त सरकारे नियंत्रणात ठेवली. भारतासारख्या मोठ्या देशात ते घडणे कठीणआहे. दिवंगत विचारवंतनरहर कुरूंदकरांनी पाकसारखीस्थिती भारतात निर्माण न होण्याचे श्रेय नेहरूंना दिले होते. लष्कराकडे केवळ बंदूक असून भागत नाही. बंदुकीतून उडवायला गोळी लागते. नेहरूंनी बंदूक आणि गोळी पुरवणाऱ्या यंत्रणावेगळ्या केल्या. आजही गोळीचीमागणी लष्करातला सरकारातल्या दुसऱ्या यंत्रणेकडे करावी लागते. त्यामुळे आपोआपच लष्कर सरकारच्या नियंत्रणातराहते. आता लष्कराचे नियंत्रण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सीडीएसकडे केंद्रितहोते आहे. त्या पदावरवरील व्यक्तीला राजकीयधुमारे फुटता कामा नयेत. 'सीएए'वरून रावत यांचे राजकारण्यासारखेविधान दूरच्याकाळजीचे आहे. स्वत:ला करता न येणाऱ्या वक्तव्यांसाठी सर्वचराजकीय नेते दुसऱ्याच्या तोंडाचा वापर करतात. या खेळासाठी भाजपने रावत यांचा वापर केलातर भविष्यातते देशाच्या अंगलट येऊ शकते.  

बातम्या आणखी आहेत...