आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडतर परिश्रम घेऊन कमावलेल्या वर्दीला कलंक लावू नका : ठाकरे

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
महिला प्रशिक्षणार्थी विजया प्रकाश यांचा गौरव करताना मुख्यमंत्री - Divya Marathi
महिला प्रशिक्षणार्थी विजया प्रकाश यांचा गौरव करताना मुख्यमंत्री
  • मजुराचा मुलगा मानाच्या तलवारीचा मानकरी
  • यापुढे ‘मानाच्या तलवारी’ ऐवजी ‘रिव्हाॅल्व्हर’ मिळणार

नाशिक - देशात येणाऱ्या आव्हानांचा समान करण्यासाठी पोलिस दल नेहमी तत्पर असते. दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी तसेच पोलिस दलाला समर्थ बनवण्यासाठी सरकारचे जे काही कर्तव्य आहे ते पार पाडले जाईल. पोलिस दलावर नेहमी ताण असतो. यामुळे त्यांचे मानसिक, शारीरिक स्वास्थ्य बिघडते. यापुढे पोलिसांचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. सर्व प्रशिक्षणार्थींनी अतिशय खडतर परिश्रम घेत ही वर्दी कमावली आहे. वर्दीला कलंक लावू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून करमाळाचे संतोष कामटे यांना मानाची तलवार व उत्कृष्ट आंतरवर्ग प्रशिक्षणार्थी म्हणून सिल्व्हर बटण आणि उत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी म्हणून नाशिकच्या विजया पवार यांना अहिल्याबाई होळकर कप देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट बाह्य प्रशिक्षणार्थी म्हणून सागर साबळे यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये सकाळी १० वाजता उपनिरीक्षकपदाच्या ११७ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमास गृहमंत्री एकनाथ शिंदे, आमदार आदित्य ठाकरे, पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, संचालक अश्वती दोरजे, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पोलिस प्रशिक्षण केंद्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी येथे इनडोअर फायरिंग रेंज, खेळांची वेगवेगळी मैदाने करण्यासह इतर सर्व सुविधांसह जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. 

मजुराचा मुलगा मानाच्या तलवारीचा मानकरी 


संतोष विठ्ठल कामट (ता. करमाळा, जि. सोलापूर)  उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली. संतोष याचे आई-वडील दोघे मजूर, तीन बहिणी. संतोष एकुलता एक भाऊ. डीएडचे शिक्षण घेऊन मिळेल ते काम करत २०१५ पासून स्पर्धा परीक्षा देत होता. त्यांच्या पालकांनी आनंद व्यक्त केला.