Home | Khabrein Jara Hat Ke | dont worry if you are fat and living in this country

येथे जाड असलेल्या नव्हे तर जाड नसलेल्या मुलींच्या लग्नात येतात अडचणी.. रंजक आहे त्यामागचे कारण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 09, 2018, 12:00 AM IST

याठिकाणी लग्नासाठी जाड मुलींनाच पहिली पसंती दिली जाते. मुलीचे वजन जर जास्त असेल तर येथे ही आनंदाची बाब समजली जाते.

 • dont worry if you are fat and living in this country

  जाड मुलींना अनेकदा स्वतःच्या शरीराबाबत दुःख होत असते. मुख्यतः अशा प्रकारे वाईट वाटण्यामागे समाज हे मोठे कारण असते. कारण इतर लोक त्यांना वेगळ्या प्रकारची वागणूक देत असतात. पण जर समाजच जाड मुलींना आनंदाने स्वीकारत असेल तर किती चांगले होईल. त्यात जर तुम्ही जाड आहात म्हणून तुम्हाला अधिक नशिबवान समजले तर.. हो असे खरंच घडते..


  खरंतर मुलगी जाड असेल तर तिच्या लग्नात अडचणी येतात असे म्हटले जाते. पण मॉरीशसमध्ये तसे नाही. याठिकाणी लग्नासाठी जाड मुलींनाच पहिली पसंती दिली जाते. मुलीचे वजन जर जास्त असेल तर येथे ही आनंदाची बाब समजली जाते. विशेष म्हणजे सासरच्या मंडळींनाही सून जाड असेल तर आनंद झालेला असतो. मुलगी जाड नसेल तर तिला लग्नाआधी भरपूर खाऊ धष्ट पुष्ट होण्याचा सल्ला दिला जातो. कारण मुलगी जाड असेल तरच तिला लवकर पसंती मिळते बारीक मुलींना येथे लवकर मुलांची पसंती मिळत नाही.


  असे आहे कारण..
  मॉरीशसमधील या धारणेमागचे कारणही अत्यंत रंजक आहे. या ठिकाणच्या परंपरा आणि मान्यांनुसार जर लडकी सुदृढ किंवा जाड असेल तर की कुटुंबासाठी आनंद आणि चांगले भाग्य घेऊन येते असे समजले जाते. कुटुंबाचा आनंद महिलेवर अवलंबून असतो आणि महिला सुदृढ असेल तर कायम कुटुंबात आनंद राहील आणि आर्थिक अडचणीही येणार नाही, असे समजले जाते. त्यामुळे येथे जाड मुली बिनधास्तपणे जगतात.

 • dont worry if you are fat and living in this country
 • dont worry if you are fat and living in this country

Trending