आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कसलीही काळजी करू नका, सरकार आपलेच येणार : उद्धव

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादीच्या अामदारांसमोर उद्धव यांचे भाषण - Divya Marathi
राष्ट्रवादीच्या अामदारांसमोर उद्धव यांचे भाषण

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलेल्या आपल्या आमदारांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी आपलेच सरकार स्थापन होणार असून काहीही काळजी करू नका असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला. यावेळी शिवसेना व राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित होते.उद्धव ठाकरे यांच्यापूर्वी शरद पवार हॉटेलमध्ये उपस्थित झाले होते. उद्धव ठाकरे आल्यानंतर फक्त या दोघांचीच एक बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांच्याबाबत काय करता येईल आणि बहुमत सिद्ध करण्याच्या वेळेस कोणती कायदेशीर अडचण उद्भवेल यावर चर्चा झाली.  राष्ट्रवादीच्या आमदारांशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना आमदार असलेल्या हॉटेलमध्ये बैठक घेतली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार मुंबईतील ३ वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये असून या सर्व आमदारांची एकत्र बैठकही लवकरच घेतली जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.धनंजय मुंडे म्हणतात... ‘मी पवार साहेबांसाेबतच’


अजितदादांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आमदार धनंजय मुंडे नॉट रिचेबल होते. परंतु संध्याकाळी ते वायबी चव्हाण येथे बैठकीला उपस्थित झाले होते. त्यावेळी शरद पवार यांच्याशी त्यांची एकांतात चर्चाही झाल्याचे सांगण्यात येते. मुंडे यांनी माध्यमांशी काहीही न बोलण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मंुडे यांच्याशी उद्धव व शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी चर्चा केली. धनंजय यांच्या मनात काय आहे किंवा अजित पवार यांनी काही मेसेज पाठवला आहे का याची माहिती घेतली जात होती. परंतु धनंजय यांनी ताकास तूर लागू दिला नाही. आपण पवार साहेबांसाेबत असल्याचे टि‌्वट मात्र त्यांनी केले. बैठकीला महाविकास आघाडीचे नेते संबोधित करणार

सर्वोच्च न्यायालय सोमवारी सकाळी बहुमत सिद्ध करण्याबाबतच्या अपिलावर आपला निर्णय देणार असून तोपर्यंत या सर्व आमदारांना हॉटेलमध्येच ठेवण्यात येणार आहे. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर या सगळ्यांची एकत्र बैठक घेतली जाईल आणि या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते संबोधित करणार आहेत.