आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरात- शुक्रवार 23 नोव्हेंबर, गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात एका नदीतून तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी हत्येची घटना आहे असे गृहीत धरून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज आणि लोकांच्या सांगण्यावरून पोलिस त्या लोकांपर्यंत पोहचले ज्यांच्यासोबत त्या मुलीला शेवटचे पाहिलेले होते, आणि हळु-हऴु सत्य समोर येणे आले. ही केस एखाद्या सस्पेंस थ्रिलरपेक्षा कमी नाहीये.
6 दिवसांपासून बेपत्ता होत्या आई आणि मुलगी
गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात डबल मर्डर केसचा खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंगनवाडी शिक्षिका नंदा सिसोदिया आणि त्यांची दत्तक मुलगी शियोना 17 नोव्हेंबरपासून बेपत्ता होत्या. पोलिसांना 6 दिवसानंतर म्हणजेच 23 नोव्हेंबरला लिमखेडा जवळ नदीत मुलीचा मृतदेह सापडला.
हळु-हळु उलगडत गेले रहस्य
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यावर कळाले की, त्या दोघींना नंदाच्या सोबत काम करणाऱ्या मंजू भभोरच्या घरी शेवटी पाहण्यात आले होते. तेव्हापासून दोघी बेपत्ता होत्या.
दाम्पत्याने कबूल केला गुन्हा
पोलिसांनी मंजू भभोर आणि तिच्या नवऱ्याची सक्तीने चौकशी केल्यावर त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. त्यांनी सांगितले की, 17 नोव्हेंबरला त्यांनी नंदाचा गळा दाबून खून केला, आणि तिची मुलगी कोणाला सांगेल या भितीने तिलाही मारून टाकले.
सिमेंटमध्ये गाडला मृतदेह
पोलिसांनी नंदाच्या मृतदेहाबद्दल विचारल्यावर त्यांनी सांगितले की, त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या हौदात मृतदेह टाकून त्यात 14 पोते सिमेंट भरले म्हणजे कोणाला त्याचा वास येणार नाही. त्यानंतर पोलिसांनी नंदाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.