आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाशी निगडित शंका ११ प्रश्नोत्तरातून करा दूर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> माझे नाव मतदार यादीत नाही, मी मतदान करू शकतो का ? 
नाव मतदार यादीत नसेल तर मतदान करता येणार नाही.

> मतदार यादीत चुकीचे नाव आहे, फोटो जुळत नाही, मतदान करता येईल का ? 
मतदान करता येईल.पण आपल्याकडे आयोगाने जी ११ ओळखपत्रे दिली आहेत, त्यापैकी एका ओळखपत्रावरील नाव आणि फोटो बरोबर असणे अपेक्षित आहे. 

> मतदानाची वेळ वेळ संपली आहे, केंद्राच्या बाहेर रांगेत आहे तर मतदान करता येईल का ?
सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. सायंकाळी ६ वाजेपूर्वी मतदान केंद्राच्या बाहेरील रांगेत आला असल्यास तुम्हाला मतदान करता येईल. 

> यादीत नाव पाहण्यासाठी काय करावे? 
मतदारांना मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळण्यासाठी https://electoralsearch.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल. शिवाय व्होटर हेल्पलाइन 1950 या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येईल.
 

> मी माझ्या पसंतीच्या उमेदवारासच मतदान केले आहे, याची खात्री मला कशी होणार ?
मतदान करताना तुम्हाला मतदान यंत्रातून आवाज येतो, मतदान पूर्ण झाल्यानंतर आवाज बंद होतो. दरम्यानच्या काळात व्हीव्हीपॅटमधून मतदान स्लीप येते, ती मतदान स्लीप तुम्हाला काचेतून तीन सेकंदासाठी पाहता येईल. यातून तुम्ही केलेल्या मतदानाची खात्री करू शकता. 

> मी दिव्यांग आहे, स्वतंत्र व्यवस्था आहे का? 
आपण दिव्यांग मतदार असाल तर रांगेत थांबण्याची गरज नाही. अंध मतदारांसाठी ब्रेललिपीतील मतदान पत्रिका उपलब्ध केली आहे. १८ वर्षावरील व्यक्तीला सहायक म्हणून काम करता येईल. दिव्यांगांना घरून आणणे व सोडण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली आहे. 
 

> महिला मतदारांसाठी विशेष व्यवस्था आहे? 
महिला मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यातील ११ मतदान केंद्राची जबाबदारी महिलांवर सोपविण्यात आली आहे. मतदान केंद्राध्यक्षांपासून ते पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत महिलांची नियुक्ती केली आहे. 
 

> मतदानासाठी दबाव टाकल्यास तक्रार कुठे करू?
मतदान करण्यासाठी कोणी दबाव टाकत असल्यास आपण मतदान केंद्रावरील बीएलओ किंवा पोलिस कर्मचाऱ्यांकडे तक्रार करावी.

> मतदान सुरू असताना दोन गटात वाद, भांडण झाल्यास पोलिसांची जबाबदारी काय? 
प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहेे. संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था आहे. 

> वृद्ध व्यक्ती, कमी दिसत असलेल्या व्यक्तींसाेबत जाऊन मतदान करता येईल का ? 
तुम्हाला मतदान करता येणार नाही. त्या व्यक्तींनाच मतदान करावे लागेल. मतदान केंद्रावर त्यांच्यासाठी व्हील चेअर, रॅम्पची सुविधा दिली आहे. मदतीसाठी स्वयंसेवकाची नियुक्ती केली आहे.
 

> माझ्या नावावर दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केले आहे. आता मी कसे मतदान करणार? 
मतदान केंद्राध्यक्षांना माहिती द्यावी. आयोगाने टेंडर वोटिंगची तरतूद केली आहे. यासाठी स्वत:ची ओळख पटवून देत तुम्हाला २ रुपयाचे चलान भरावे लागेल. त्यानंतर बॅलेट पेपरवर मतदान करता येऊ शकते.

 

बातम्या आणखी आहेत...