Home | Business | Share Market | downtrend-in-mumbai-sharemarket

निर्देशांक 208 अंकांनी गडगडला

बिझनेस ब्यूरो | Update - May 19, 2011, 05:16 PM IST

मंगळवारी शेअर बाजारातील कारभारात सामसूम राहिली आणि खूप मोठ्या प्रमाणात पडझड होऊन शेअर बाजार बंद झाला.

  • downtrend-in-mumbai-sharemarket

    मंगळवारी शेअर बाजारातील कारभारात सामसूम राहिली आणि खूप मोठ्या प्रमाणात पडझड होऊन शेअर बाजार बंद झाला. एसबीआयच्या अत्यंत वाईट कामगिरीनंतर बाजारावर त्याचे पडसाद दिसून आले. एसबीआयचा निव्वळ नफा जाहीर झाल्यानंतर बॅंकेच्या शेअर्समध्ये 7.50 टक्क्यांची प्रचंड घट झाली.

    मंगळवारी बीएसईचा निर्देशांक 208 अंकांच्या घसरणीनंतर 18, 137.35 वर बंद झाला. राष्ट्रीय स्टॉक एक्चेंजचा निफ्टी 60.05 घटुन 5,438.95 वर बंद झाला. बीएसईच्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये अनुक्रमे 0.66 आणि 0.61 टक्क्यांची घट झाली.
    पडझड झालेल्या कंपन्यांमध्ये एसबीआय, ओएनजीसी, हिरो होंडा, रिलायन्स आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर समाविष्ट आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हर, जिंदल स्टील, टीसीएस, आयटीसी आणि बजाज अॅटो हे शेअर्स वधारून बंद झाले. एनएसईचा 50 शेअर्सचा निफ्टी निर्देशांक 02.90 अंकांच्या घसरणीसह 5496.10 वर बंद झाला. सोमवारी 5499.00 अंकांवर शेअर बाजार बंद झाला होता.

Trending