Home | Business | Share Market | downtrend-in-mumbai-sharemarket

शेअर बाजारात घसरण सुरूच

वृत्तसंस्था | Update - May 20, 2011, 01:49 PM IST

बाजारात तेजी असूनही मिडकॅप 47.62 अंकांनी घसरून 6715.23 वर तर स्मॉलकॅप 44 अंकांनी घसरून 8145.57 अंकांवर बंद झाला.

  • downtrend-in-mumbai-sharemarket

    मुंबई - बाजारात तेजी असूनही मिडकॅप 47.62 अंकांनी घसरून 6715.23 वर तर स्मॉलकॅप 44 अंकांनी घसरून 8145.57 अंकांवर बंद झाला. बीएसईमध्ये आज एकूण 2909 कंपन्यांच्या शेअर्सचा व्यापार झाला ज्यात 1072 शेअर्समध्ये नफा तर 1683 शेअर्समध्ये तोटा झाला. इतर 154 शेअर्समध्ये कोणतीही हालचाल झाली नाही.

    युरोप आणि अमेरिकेतील बाजारात वृद्धी दिसून आली. आशियात चीन आणि जपान वगळता इतर सर्व बाजारांत तेजी राहिली. निर्देशांकात उसळी घेणा:या शेअर्समध्ये एल ऍण्ड टी 5.92 टक्के नफा कमावत सर्वात पुढे राहिली. कंपनीचे शेअर्स 89.15 रुपयांनी वाढून प्रती शेअर 1594.90 रुपयांवर पोहोचले. लाभ कमावणा:या इतर कंपन्यांमध्ये आरईएल 1.45, ओएनजीसी 1.20, टीसीएस 1.14, महिंद्रा 1.11, टाटा मोटर्स 0.40, बजाज ऑटो 0.34, सिप्ला 0.26, जिंदल स्टील 0.23, इन्फोसिस 0.20, हिंदुस्थान यूनि 0.18 आणि आयटीसी 0.16 टक्के यांचा समावेश होतो.

    आज तोटा झालेल्या शेअर्समध्ये रिलायन्स कम्यु. 3.43, डीएलएफ 3.35, हिंदाल्को 3.14, टाटा पॉवर 2.60, हीरो होंडा 2.31, एअरटेल 1.68, टाटा स्टील 1.53, रिलायन्स इन्फ्रा. 1.37, एसबीआय 1.19, विप्रो 0.62, मारुती 0.44, एनटीपीसी 0.32, एचडीएफसी 0.31, भेल 9.19 आदींचा समावेश आहे.

Trending