Home | National | Other State | Dowry Case Accused Woman Told Supreme Court Extend Surrender Date For Her To Get Married

माय-लॉर्ड, मला सरेंडरची तारीख वाढवून द्या, तुरूंगात गेले तर कोणीच माझ्याशी लग्न करणार नाही, चीफ जस्टिस म्हणाले- तू मला आमंत्रण दिलेच नाहीस...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 16, 2019, 05:43 PM IST

आरोपी महिला म्हणाली-22 एप्रिलला आहे साखरपुडा

 • Dowry Case Accused Woman Told Supreme Court Extend Surrender Date For Her To Get Married

  नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टात सोमवारी हुंडा आणि डोमेस्टीक व्हायलंसच्या केसमध्ये आपल्या लग्नाचे कारण दाखवून तुरूंगात जाण्यासाठी वेळ मागितला. पण सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस रंजन गोगोईंच्या अध्यक्षतेखाली असलेल्या बँचने या विनंतीला नकार दिला.


  सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीदरम्यान हुंडा आणि मारहाणीच्या केसमध्ये आरोपी महिला म्हणाली- मी 30 वर्षांची आहे. मला पोलिसांनी सरेंडर होण्यास सांगितले आहे. माझा साखरपुडा 22 एप्रिलला आहे आणि त्यानंतर लग्न आहे. त्यामुळे सरेंडर करण्याची तारीख वाढवून देण्यात यावी.


  हे प्रश्न विचारले
  चीफ जस्टिस - तुम्हाला लग्नानंतर सरेंडर करायचे आहे?
  महिला- हो, मी नंतर सरेंडर करेल.
  चीफ जस्टिस - आम्ही याची अनुमती देऊ शकत नाहीत. यामुळे दुसऱ्या पक्षाची नाराजी होऊ शकते.
  चीफ जस्टिस (शेवटी मस्करीत) - तुम्ही आम्हाला तर लग्नाला बोलावलेच नाही. त्यानंतर त्यांनी महिलेच्या विनंतीला रद्द केले.

Trending