Home | International | China | Dozen people killed and hundreds injured after two strong earthquakes rocks China

चीनच्या सिचुआन प्रांतात मोठा भूकंप, किमान 11 जणांचा मृत्यू, शंभराहून अधिक लोक जखमी

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 18, 2019, 10:37 AM IST

सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी भूकंपाचे दोन तीव्र झटके

  • Dozen people killed and hundreds injured after two strong earthquakes rocks China

    बीजिंग - चीनच्या सिचुआन प्रांतात रात्री भूकंपाचे दोन मोठे झटके बसले. यामध्ये किमान 11 जणांचा मृत्यू झाला असून 122 जण जखमी झाले आहेत. चीनच्या या भूकंपाचे केंद्र यिबिन शहर होते. स्थानिक वेळेनुसार, सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास पहिला भूकंप आला. तर मंगळवारी सकाळी भूकंपाचा दुसरा हादरा बसला. या भूकंपाची तीव्रता 6 आणि 5.3 रिश्टर स्केल एवढी होती. पहिला भूकंप आला त्यावेळी बहुतांश लोक झोपेत होते. सिचुआन प्रांतात अनेक बहुमजली इमारती आहेत. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहेत.


    पीडितांच्या मदतीसाठी लागले 5 हजार टेन्ट
    सिचुआन प्रांताच्या राजधानीत लोकांना भूकंप येण्याच्या मिनिटभरापूर्वीच सतर्क करण्यात आले होते. त्यामुळे, अनेक जण घरे सोडून बाहेर पडले होते. तर बरेच जण झोपेत असल्याने त्यांची झोप भूकंपाच्या तीव्र झटक्याने उघडली. पहिल्या झटक्यानंतर रात्रभर लोक रस्त्यावर होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा एक मोठा भूकंप झाला. अशात घाबरलेल्या लोकांना तात्पुरत्या आश्रयासाठी 5 हजार तंबू लावण्यात आले होते. सोबतच, सिचुआन प्रांताच्या राजधानीत 20 हजार बेड, 20 हजार शतरंज्या आणि खाद्यसामुग्री पाठवण्यात आली. या भूकंपाने मेईदोंग शहरात असलेल्या एका हॉटेलची अख्खी इमारत कोसळली. भूकंपात या हॉटेलच्या भिंतींना तडे गेल्यानंतर इमारत रिकामी करण्यात आली होती. या शहरातील दूरसंचार यंत्रणा ठप्प झाली आहे.

Trending