Home | Sports | Other Sports | dr. ramgopal kalani set new record in swiming

30 तास सलग पोहण्याच्या विक्रमास परभणीत सुरुवात

Agency | Update - May 29, 2011, 01:50 AM IST

लिम्का बुकमध्ये नोंद करण्यासाठी वयाच्या 47 व्या वर्षी सलग 30 तास पोहण्याच्या विक्रमास बालरोगतज्ज्ञ डॉ.रामगोपाल कालानी यांनी काल,शनिवारी 28 मे रोजी सकाळी 10 वाजता सुरुवात केली.

  • dr. ramgopal kalani set new record in swiming

    परभणी - लिम्का बुकमध्ये नोंद करण्यासाठी वयाच्या 47 व्या वर्षी सलग 30 तास पोहण्याच्या विक्रमास बालरोगतज्ज्ञ डॉ.रामगोपाल कालानी यांनी काल,शनिवारी 28 मे रोजी सकाळी 10 वाजता सुरुवात केली.

    डॉ.रामगोपाल कालानी हे गत दशकापासून परभणीमध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. वैद्यकीय व्यवसायात मग्र असतानाच जलतरणाचा छंद डॉ.कालानी जोपासत आहेत. 2002 मध्ये डॉ.कालानी यांनी सलग 12 तास पोहण्याचा विक्रम आपल्या नावे नोंदवला होता.त्यापाठोपाठच 2007 मध्येही 24 तास सलग पोहण्याचा विक्रम डॉ.कालानी यांच्या नावावर नोंद आहे.तब्बल 30 तास सलग पोहण्याचा विक्रम लिम्का बुकमध्ये नोंद करण्यासाठी डॉ.कालानी यांनी सुरुवात केली आहे.या पोहण्याला शनिवारच्या सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. अनोख्या विक्रम नोंदीला पाहण्यासाठी जलतरण तलावाजवळ चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.

Trending