औरंगाबाद येथील शासकीय दूध डेअरी परिसरात किमान 35 कोटी रुपये खर्च करून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे बांधकाम करण्यात आले. या न्याय भवनाच्या बांधकामास एक वर्ष उलटून गेले आहे. मात्र, अद्यापही शासनाने या भवनाचे उद्घाटन करण्यासाठी पावले उचलली नाहीत. त्यातच या सुंदर, देखण्या इमारतीत उद्घाटनाअगोदरच जात पडताळणी कार्यालयाने आपले ठाण मांडले असून येथूनच कामकाज पाहिले जात आहे. या इमारतीत सध्या सुरू असलेले कार्यालय बंद करून न्याय भवनाचे शासकीय पद्धतीने उद्घाटन झाल्यानंतर सर्व कार्यालये स्थलांतरित करावीत.