Home | Mukt Vyaspith | Dr.Gautam Bhansali Article About Seasonal Disease

बदलत्या ऋतुंमधील ठराविक आजार, सांगताहेत बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. गौतम भन्साली

संकलन: उत्कर्षा महाजन | Update - May 26, 2016, 01:22 PM IST

बरेच आजार हे ऋतूमानानुसार उद्भवतात. मात्र वेळीच काळजी घेतली तर निदान योग्य होऊ शकते.

 • Dr.Gautam Bhansali Article About Seasonal Disease
  बरेच आजार हे ऋतूमानानुसार उद्भवतात. मात्र वेळीच काळजी घेतली तर निदान योग्य होऊ शकते. येथे तुम्हाला लेप्टोस्पायरोसीस या पावसाळ्यात उद्भवणा-या आजाराविषयी सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊयात बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. गौतम भन्साली यांच्याकडून....
  लेप्टोस्पायरोसीस हा पाळीव व वन्य प्राण्यांमुळे होणारा रोग आहे. हा रोग लेप्टोस्पायरा नावाच्या जिवाणूमुळे होतो म्हणून त्याला लेप्टोस्पायरोसीस असे म्हणतात.

  ग्रीक भाषेत 'लेप्टोस' ह्या शब्दाचा अर्थ बारीक किंवा नाजूक असा होतो आणि latin मध्ये 'स्पायरा' म्हणजे कॉईल (गुंडाळी).
  उत्पत्ती/प्रसार :
  लेप्टोस्पायरोसीस मुख्यतः शेती, पशुवैद्यकीय, नाले सफाई तसेच पाळीव किंवा वन्य प्राण्यांशी संपर्क असलेल्या व्यवसाय क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळून येतो. ह्या रोगाचा प्रसार संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या मूत्रातून होतो. लेप्टोस्पायरोसीस हा संसर्गजन्य रोग आहे.
  पुढे वाचा..
  > निदान
  > उपचार
  > रोगाशी संबंधित चिंताजनक बाबी
  >प्रतिबंध
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • Dr.Gautam Bhansali Article About Seasonal Disease
  लक्षणे:
  ताप, डोकेदुखी, थंडी भरणे, उलट्या होणे, कावीळ, अशक्तपणा आणि काहीवेळा अंगावर चट्टे येणे ही लेप्टोस्पायरोसीसची प्रमुख लक्षणे आहेत. 
  लेप्टोस्पायरोसीस झालेला व्यक्ती सतत आजारी पडतो व अनेकदा रुग्णालयात दाखल होतो. 
  ह्या रोगाचा इनक्यूबेशन पिरीयड म्हणजे जीवनुंशी संपर्कात आल्यानंतर लक्षणे दिसून येण्यासाठी लागणारा कालावधी हा साधारणपणे ५ ते १४ दिवसांचा असतो. काहीवेळा हा कालावधी २ ते ३० दिवसांपर्यंत कमीजास्त होऊ शकतो. 
 • Dr.Gautam Bhansali Article About Seasonal Disease
  निदान: 
  लेप्टोस्पायरोसीस ह्या रोगाचे निदान काही विशिष्ट अशा रक्ततपासन्यांद्वारे सार्वजनिक हेल्थ लेबोरेटरीज मध्ये करता येऊ शकते. 
   
  उपचार :
  लेप्टोस्पायरोसीसवर उपचार पेनिसिलिन किंवा डॉक्सिसायक्लीन सारख्या प्रतिजैविकांच्या वापरणे केला जातो. क्वचितच किडनी डायलिसीस करण्याची गरज पडू शकते. 
   
  रोगाशी संबंधित चिंताजनक बाबी :
  योग्य आणि वेळीच इलाज न केल्यास रुग्णाच्या मूत्रपिंडाला म्हणजेच किडनीला इजा होण्याची शक्यता असते. अगदी थोड्या प्रमाणात मृत्युदेखीत होऊ शकतो. 
   
  प्रतिबंध: 
  स्वच्छता राखणे, गरजेच्या ठिकाणी बूट आणि ग्लोवजचा वापर करणे तसेच किटकक्नाशाकांची  योग्य  प्रमाणात फवारणी करणे हे लेप्टोस्पायरोसीस होण्यापासून रोखण्याचे उत्तम उपाय. 

Trending