Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Dr. Nayana Chandak's death in train due to heart stop working

रेल्वेत हृदयक्रिया बंद पडून डॉ. नयना चांडक यांचा मृत्यू; मुलानंतर मुलीच्या मृत्यूने परिवारावर शोककळा

प्रतिनिधी | Update - Sep 03, 2018, 11:29 AM IST

स्थानिक शासकीय कंत्राटदार संतोष चांडक यांच्या मुलीचा रविवारी पहाटेच्या सुमारास धावत्या रेल्वेत हृदयक्रिया बंद पडून मृत्

  • Dr. Nayana Chandak's death in train due to heart stop working

    अकोट- स्थानिक शासकीय कंत्राटदार संतोष चांडक यांच्या मुलीचा रविवारी पहाटेच्या सुमारास धावत्या रेल्वेत हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाला. मुंबईवरून अकोटला येताना डॉ. नयना(नमिता)संतोष चांडक (वय २७) हिचा भुसावळजवळ पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला.


    चांडक यांचा मुलगा निखिलचा गेल्या वर्षी कारगिल भागांमध्ये ट्रेकिंग करताना मृत्यू झाला होता. डॉ. नयना (नमिता)चांडक कुटुंबियासह मुंबईला गेली होती. मुंबईवरून परत येताना धावत्या रेल्वेमध्येच तिला त्रास होऊ लागला. वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच हृदयक्रिया बंद पडून तिचा मृत्यू झाला. नयनाचे शिक्षण एमडीपर्यंत झाले होते. तिचा भाऊ निखिल हा सुद्धा बी.ई.झालेला होता. गेल्या वर्षी तो मित्रांसमवेत सहलीला कारगिल भागात गेला होता.पहाटे ट्रेकिंग करताना त्यांचा अपघात होऊन तो कोसळला व त्यात त्याचा मृत्यू झाला होता. दोन्ही अपत्यांचा दोन वर्षांमध्ये मृत्यू झाल्यामुळे संतोष चांडक व त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शोकाकुल वातावरणात नयनावर सायंकाळी अंत्यसंस्कार केले.

Trending