Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Dr. Dhanraj Patil S facilitated at international level

डॉ. धनराज पाटील यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 10, 2018, 11:37 AM IST

आशिया व अाफ्रिका आंतरराष्ट्रीय ग्रामीण विकास संघटनेने डॉ. धनराज पाटील यांच्या लेखाची दखल घेतली आहे.

  • Dr. Dhanraj Patil S facilitated at international level

    सोलापूर- आशिया व अाफ्रिका आंतरराष्ट्रीय ग्रामीण विकास संघटनेने डॉ. धनराज पाटील यांच्या लेखाची दखल घेतली आहे. डॉ. पाटील यांच्या ग्रामीण विकासातील योगदानासाठी व त्यांच्या संशोधन वृत्तीचा गौरव म्हणून दोनशे अमेरिकन डॉलर व सन्मान पत्र देण्यात आले. संशोधन विकास विभागाचे प्रमुख डॉ. खुर्शीद यांनी ही माहिती दिली.


    ग्रामीण महाराष्ट्रातील समूह सहभागी अपारंपरिक वीज निर्मिती प्रारूप व सामाजिक परिवर्तन आणि डिजिटल डेमॉक्रसी व ग्रामीण विकासाचे नव प्रतिमान हे त्यांचे लेख स्कोपस इंडेक्स असलेल्या नियतकालिकेत प्रकाशित झाले होते. या दोन्ही लेखातील धोरणात्मक उपयोजितता व योजनाचे भविष्यकालीन महत्त्व लक्षात घेऊन तज्ज्ञ परीक्षकांनी या लेखाची निवड केली.

Trending