Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Dr. Patil's broken nose, swelling on liver in fighting

भाजपच्या दोन गटांत हाणामारी : मारहाणीत डॉ. पाटील यांच्या नाकाचे हाड मोडले, लिव्हरवरही सूज

प्रतिनिधी | Update - Apr 12, 2019, 09:28 AM IST

बुधवारी भाजपच्या मेळाव्यात दोन गटांत झाली होती हाणामारी

  • Dr. Patil's broken nose, swelling on liver in fighting
    अमळनेर - बुधवारी भाजपच्या मेळाव्यात दोन गटांत झालेल्या हाणामारीत जखमी झालेले भाजपचे माजी आमदार डॉ.बी. एस. पाटील यांच्या नाकाचे हाड मोडले असून त्यांच्या लिव्हरलाही सूज आली आहे. धुळ्यातील एका खासगी हाॅस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
    बुधवारी सायंकाळी अमळनेरमध्ये भाजपचा मेळावा झाला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी आमदार डॉ.बी. एस. पाटील यांना भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.

Trending