आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दालचिनीची पारख कशी कराल?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 डॉ. अदिती, आहार विशेषज्ञ काही विशिष्ट प्रसंगी किंवा मसाल्यामध्ये दालचिनीचा वापर केला जातो. मसाल्याच्या दुकानात दालचिनीसारखाच दिसणारा मसाल्याचा आणखी एक पदार्थ असतो त्याला केसिया असं म्हणतात. केसिया म्हणजे चायनीज दालचिनी. दालचिनी आणि केसिया दिसायला अगदी एकसारखेच असतात. मात्र काही लक्षणांवरून तुम्ही या दोन्हीमधला फ‌रक समजून घेऊ शकता. आणि या फरकामुळेच तुम्ही अस्सल दालचिनीची निवड करू शकता. भारतीय आहारात वापरली जाणारी दालचिनी मुख्यत्वे श्रीलंका आणि भारतात दिसून येते, तर केसिया चीन, व्हिएतनाम आणि इंडोनेशियामध्ये प्रामुख्यानं दिसून येते. चला तर मग अस्सल दालचिनी कशी ओळखायची ते पाहूयात...

  • दालचिनी चवीला सौम्य, गोड आणि लवंगसारखी तिखट लागते. केसिया अतिशय तिखट असते.
  • दालचिनी फिकट भुऱ्या रंगाची असते. ती सहजतेनं बारीक करता येते, तर केसिया लालभुऱ्या रंगापासून ते गडद भुऱ्या रंगांमध्ये मिळते. केसिया लाकडासारखी जाडसर थराची असते.
  • दालचिनी आतल्या बाजूनं गोलाकार वळलेली असते. शिवाय ती गुळगुळीत असते. केसिया झाडाच्या जाड सालीसारखी असते. बाजारात ही तुकड्या तुकड्याच्या स्वरूपात मिळते.
  • दालचिनी आरोग्यासाठी हानिकारक नसते, मात्र केसिया आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असते. याचा रोज आहारात समावेश केल्यास लिव्हर आणि किडनीच्या समस्या उद्भवू शकतात.
बातम्या आणखी आहेत...