आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा सुरूवात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. अनुपमा माहेश्वरी, करिअर समुपदेशक

नोकरदार महिलेच्या आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते की, तिला नोकरीतून काही काळासाठी ब्रेक घ्यावा लागतो. ब्रेकनंतर पुन्हा नव्यानं करिअरची सुरूवात करावी लागते. या प्रवासात मदत होईल अशा काही गोष्टी... 


श्रुती कॉलेजला असताना ओळखीतल्या लोकांसाठी हेल्दी डायट प्लॅन करायची. पण लग्नानंतर कुटुंब आणि मुलांमध्ये गुंतून गेली. लग्नाच्या २० वर्षांनंतर तिने पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी काय करू असा विचार सुरू असताना मित्रांच्या सल्ल्यानं तिने डायटिशनचा कोर्स करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तिच्या मनात भीती होती. मात्र आज श्रुती चागंली डायटिशन आहे. करिअरमध्ये विशिष्ट अंतरानंतर अर्थात गॅपनंतर नवीन सुरुवात करणे अवघड नाही. काही गोष्टींची काळजी घेतल्यास हा प्रवास सोपा होतो.  

कालावधी ठरवून घ्या 


नोकरीपासून किती काळासाठी दूर राहायचं आहे त्याचा कालावधी ठरवा. पुन्हा कामावर रुजू होण्याचं नियोजन करा. त्यामुळे पुन्हा काम करण्याची मानसिकता तयार होते. 

नियोजन करा


नोकरीतून काही काळासाठी ब्रेक घ्यावा लागणार असेल तर ब्रेक घेतल्यावर नेहमी सकारात्मक विचार करा. या काळात काही नवीन शिका. या काळात स्वत:च्या ग्रुमिंगवर लक्ष द्या. नवनवीन गोष्टींचा अभ्यास करा. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेवा. वाचन करा.

काम करत राहा


नोकरीतून ब्रेक म्हणजे पूर्णवेळ घरात बसून राहाणं नक्कीच नाही. फ्रीलान्सिंग, इंटर्नशिप, वर्क फ्रॉम होमचे अनेक पर्याय आज विविध क्षेत्रांत उपलब्ध आहेत. त्याचा विचार करा. घरचा परंपरागत व्यवसाय असल्यास त्यात मदत करा.

अपडेट राहा


ब्रेकनंतर पुन्हा पूर्वीच्याच क्षेत्रात जायचे असल्यास त्याबद्दल स्वत:ला अपडेट ठेवा. शिवाय या काळात तुम्हाला तुमचं करिअर बदण्याचीही संधी असते. त्यानुसार तुम्ही नियोजन करा. तुमच्या कौशल्यात वाढ करा.

ब्रेकबद्दल स्पष्टता ठेवा


पुन्हा नवीन सुरुवात करताना आत्मविश्वास कमी होऊ शकतो. पण तुम्हाला स्वत:ला या ब्रेकबद्दल स्पष्टता असेल तर तुम्हाला ते स्पष्ट शब्दात सांगा. ब्रेकबद्दल मनात अपराधभाव ठेवू नका. गॅपमुळे आपण मागे पडलो ही भावना मनात येऊ देऊ नका. त्यासाठी तुमच्या क्षेत्रातल्या सहकारी, मित्रांच्या संपर्कात राहा.
 

बातम्या आणखी आहेत...