आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनानिवडणूक पहिल्या संमेलन अध्यक्षांचा मान डॉ. अरुणा ढेरेंना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारीत यवतमाळ येथे होत असून संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री तथा लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. अरुणा ढेरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रविवारी साहित्य महामंडळाच्या बैठकीत प्रदीर्घ चर्चेनंतर डॉ. अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी बैठक संपल्यावर डॉ. ढेरे यांच्या नावाची घोषणा केली. साहित्य संमेलन अध्यक्ष निवड आणि संमेलनाच्या तारखा निश्चित करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. त्यासाठी मुंबई, पुणे, मराठवाडा, छत्तीसगड, इंदूर, कर्नाटक, गोवा, औरंगाबाद, बडोदा,

 

नागपूर अादी ठिकाणावरून सदस्य उपस्थित होते.  महामंडळाने घटनादुरुस्ती केल्यानंतर प्रथमच महामंडळाच्या सदस्यांनी विनानिवडणूक सर्वानुमते अध्यक्षांची 
निवड केली. त्यासाठी बैठकीत अनेक नावांवर खल झाला. मात्र डॉ. ढेरे यांचे नाव सर्वानुमते निश्चित झाले. १८ वर्षानंतर महिला साहित्यिकाची अध्यक्षपदी निवड होणे मुळात हिच एक मोठी सांस्कृतिक घटना असल्याचे यावेळी महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी म्हणाले.


११ ते १३ जानेवारीला संमेलन 
९२ वे मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे ११, १२ व १३ जानेवारी राेजी होणार अाहे. यवतमाळ जिल्हा हा कृषीप्रधान आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्याने महामंडळ त्या संदर्भात संवेदनशील असून या संमेलनात शेतकऱ्यांच्या विषयावर एक विशेष परिसंवाद अायाेजित करण्यात अाला अाहे.


अध्यक्षपदाचा मान मिळविणाऱ्या पाचव्या महिला
आतापर्यंत पार पडलेल्या ९१ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात अाजवर केवळ ४ वेळा अध्यक्षपदी महिला साहित्यिकांची अध्यक्षपदी निवड झाली हाेती. यंदाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे या पाचव्या आहेत. विशेष म्हणजे १७ वर्षानंतर या महिला साहित्यिकाची यंदा निवड झाली. यापूर्वी कुसमावती देशपांडे, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, दुर्गाबाई भागवत या चार महिलांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...