आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उतरणीची सोबत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. अरविंद गुजराती

प्रत्येक आठवण सुखाची नसते. सांगायला कुणीच नसते. ही जीवनाची सत्यता आहे. पैलतीराची वाटचाल करताना कुणा जोडीदाराची साथ असावी याची वरचेवर जाणीव होते. अर्थात गेलेल्या जोडीदाराशिवाय एकाकी सर्व आठवण येत असते. त्यामुळे निराशा वाढत जाते. अशा वेळी आयुष्याच्या उतरणीवर चांगला मित्र हवा असतो.
 
नाते किती जुने यावर नाही टिकत, नाती टिकायला नाती खोल असावी लागतात. बी कुठेही पेरल्यावर झाडे उगवत नाहीत. मुळात जमीन मुख्यत: ओली असावी लागते. आयुष्याचा पूर्वार्ध तपासला तर सरत्या आयुष्याकडे बघताना काय दिसतं तर कुटुंबातल्या नवीन नात्याची नवीन वीण, त्यातील सुखदु:ख व निर्भेळ आनंद, तोही आपल्याला वाटून घ्यावा लागतो. मुलाच्या शिक्षणावर झालेल्या एकरकमी खर्चाने हाती राहिलेली फाटकी कफल्लक झोळी, स्वत:चं जगणं भाग पडत जातं. आयुष्य आपलं जरी असलं तरी जगण्याची सारी धडपड मुलांच्यासाठी.

जोडीदाराबरोबरचा सहवास मात्र अधिकाधिक पक्व होत जातो. अनेक गोष्टी न सांगताच कळत जातात. नजरेच्या नुसत्या कडेतून खूप काही व्यक्त होतं. लटक्या भांडणातूनही प्रेम ओसंडत असतं व आयुष्य एक झाल्याची जाणीव होते. अशा वेळी आयुष्यभराची साथसंगत अचानक सुटून गेल्यावर जीवनाच्या सायंकाळी एकाकी जीवन जगण्याचा विषण्ण अनुभव घेण्याची पाळी येते. मुले-सुना त्यांच्या संसारात मग्न असतात. माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढी ती दूर जातात. फुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळ्याही गळून पडतात. ज्याला मनापासून आपलं मानलं तीच आपल्यापासून दूर जातात.

फुले वाळू लागल्यावर फुलपाखरेही उडून जातात. प्रत्येक आठवण सुखाची नसते. सांगायला कुणीच नसते. ही जीवनाची सत्यता आहे. पैलतीराची वाटचाल करताना कुणा जोडीदाराची साथ असावी याची वरचेवर जाणीव होते. अर्थात गेलेल्या जोडीदाराशिवाय एकाकी सर्व आठवण येत असते. त्यामुळे निराशा वाढत जाते. अशा वेळी आयुष्याच्या उतरणीवर चांगला मित्र हवा असतो. मैत्री हे एक भावुक नातं असतं. गमतीची गोष्ट म्हणजे याला कुठलही बंधन नाही. ना वयाचं ना सामाजिक स्थानाचं. असते ती निखळ मैत्री. एकमेकांना समजावून घेणारी. या वयात शारीरिक आकर्षणही कमी कमी होत जाते. अशा वेळी आत्मसन्मानाचा विचार न करता स्वत:च्या मुलांसमोर हा प्रस्ताव जरूर मांडावा. 

उतारवयात त्यांना जोडीदार पाहिजेत. वाढत्या वयात एकाकी जीवन भयाणच आहे. आपला साथीदारच तो जितका मोकळेपणाने असेल तर मनातील सल, दु:ख त्यांना खायला उठेल हा विचार करून समंजस मुलेही नक्कीच वरील प्रस्ताव मान्य करतील. या उतारवयात आधार म्हणून नक्कीच त्यांना राहता येईल. हा काही करार नाही किंवा शारीरिक आकर्षण नाही. तर त्याचा संबंध थेट आत्म्याशी आहे. त्याही पलीकडे तो एक समरसतेची श्रद्धेय प्रक्रिया आहे. ती एकमेकांच्या मनात असणे जरुरीची आहे. मग लग्न करून अथवा प्रेमाने एकमेकांना समजावून आधार म्हणून एकत्र राहिले तरी आपल्या सामाजिक वातावरणात अशा प्रकारे ज्येष्ठांच्या पुनर्विवाहाची कल्पना नवी असली तरी त्याची गरज अात्यंतिक तीव्र असल्याची आणि आयुष्याच्या संध्याकाळी जोडीदाराची निकड असल्याची भावना शेकडो ज्येष्ठांनी ठिकठिकाणी व्यक्त केली, हीच कल्पना व्यापक पातळीवर राबवायला पाहिजे. अशा ज्येष्ठांना कायदेशीर मदत, सल्ला, प्रोत्साहन, पाठिंबा आणि जोडीदार निवडीची संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे कौटुंबिक प्रश्नचिन्हे आपोआप सैल होतील.

बातम्या आणखी आहेत...