आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळे घेतील केसांची काळजी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यादरम्यान केस गळणे आणि कोंडा होणे ही एक सामान्य समस्या असते. तिला तोंड देण्यासाठी नैसर्गिक माध्यमांद्वारे केसांची हानी थांबवली जाऊ शकते.
 

> चेरी 
हे फळ डोक्यावरील त्वचेचा पीएच स्तर संतुलित करते, जे केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहे. त्यात व्हिटॅमिन ए, बी, के आणि ई असते. ते केसांना पोषण तर प्रदान करतेच शिवाय केसांना आणि त्वचेला हायड्रेटेडही ठेवते.

असा करा वापर : एक मूठभर चेरी घ्या आणि मिक्सरमध्ये टाकून त्यांचा रस काढा. हा रस केसांच्या मुळांशी लावा आणि १ तासभर लावलेला राहू द्या. त्यामुळे केसांची मुळे रस चांगल्या प्रकारे शोषून घेतील. १ तासानंतर पाण्याने धुऊन घ्या.
 

> आलुबुखारा  
यात व्हिटॅमिन सी भरपूर असते आणि ते कोंडा नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. डोक्यात होणारी खाज आणि जळजळ दूर करते, डोक्याच्या त्वचेवर रोम छिद्रांना उघडण्यास साहाय्यभूत ठरते आणि केसांची वेगाने वाढ करते. आलुबुखारा डोक्यात रक्तप्रवाह ठीक करते, केसांना पोषण मिळते. त्यातील व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई दोन्ही शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स आहेत.

असा वापर करा : दोन आलुबुखारा घेऊन त्यांचे साल आणि बिया काढा. एका बाउलमध्ये आलुबुखारा चमच्याने चांगला स्मॅश करून घ्या. त्यात थोडा मध आणि लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण केसांना लावा किमान ३० मिनिटे लावलेले राहू द्या. त्यानंतर केस थंड पाण्याने धुवा.

> डाळिंब 
डाळिंबाच्या बियांत प्युनिक अॅसिड आढळते. ते रक्तप्रवाह नियमित करते आणि डोक्याच्या त्वचेत रक्त प्रवाहात सुधारणा करून केसांची मुळे मजबूत करते. डाळिंबाच्या तेलाचा वापर कुरळ्या केसांना सिल्की बनवण्यासाठी आणि त्यांचे कंडिशनिंग करण्यासाठीही केला जाऊ शकतो.

असा करा वापर : २-३ डाळिंबांच्या साली उन्हात वाळवा. सर्व साली मिक्सीत दळून घेऊन त्याची पावडर तयार करा. ती पावडर नारळाच्या तेलात मिसळून केसांना चांगल्या प्रकारे मालिश करा आणि किमान २ तास लावलेले राहू द्या. त्यानंतर सौम्य शॅम्पूने धुवा.

> लिची 
जेव्हा रोम छिद्रे योग्य प्रकारे पोषित असतात तेव्हा केसांची वाढ होते. कॉपर पेप्टाइड्स केसांच्या रोम छिद्रांना मोठे करते, त्यामुळे केसांची वाढ होते. लिची कॉपरचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. ते केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असते. लिचीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण भरपूर असते, त्याची केसांची चमक कायर राखण्यात मुख्य भूमिका आहे.

असा करा वापर : एका मोठ्या बाउलमध्ये ८-१० लिचींचा रस काढून तो दोन चमचे अॅलोवेरा जेलमध्ये मिसळा. त्याची पेस्ट बनवा आणि नंतर पूर्ण केसांवर चांगल्या प्रकारे लावा. हा हेअर मास्क किमान एक तास लावलेला राहू द्या आणि नंतर केस थंड पाण्याने धुवा.
 
 

बातम्या आणखी आहेत...