आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेखुदी का कोई इलाज नहीं...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. आसिया पटेल

शायरी आणि इतर रचना सुफियाना अंदाजातून सादर करणाऱ्या, लेखनाबरोबरच सतारवादनाची आवड असणाऱ्या जमीला खुदा बक्श यांच्याबद्दल आजच्या लेखात...

जमीला खुदा बख्श यांचा जन्म कोलकाता इथं १८६१ मध्ये झाला. ती उर्दूची प्रसिद्ध शायरा होती. अजिमाबादची ती प्रथम साहेब दिवाण शायरा होती. भारतातील प्रसिद्ध ग्रंथालय खुदा बक्श ग्रंथालयाच्या संस्थापकांची ती तिसरी पत्नी होती. जमीला यांनी त्याच्या शायरीत प्रख्यात शायर शाद अजीमाबादी यांच्याकडून शायरीमध्ये सुधारणा करवून घेतल्या. 

देता हूँ दिल जिसे वो कहीं बेवफा ना हो
ये इश्क मेरे वास्ते शायद कजा ना हो

जमीला यांचे खरे नाव रजिया खातून होते. जमीला हे त्यांचे टोपणनाव होते. जमीला यांचं माहेर शैक्षणिक आणि साहित्यिकदृष्ट्या संपन्न होते. जमीला यांच्या लग्नानंतर मौलवी खुदा बक्श यांनी त्यांच्या बौद्धिक अभिरुचीचे कौतुक केले होते. पतीच्या प्रोत्साहनामुळे जमीला यांच्या शायरीच्या आवडीला, लिखाणाला अधिक झळाळी मिळत गेली. कारण जमीला यांचे पतीही एक उत्तम लेखक होते. जमीला या शायरा असल्या तरी त्यांचा मूळ स्वभाव हा सुफियाना होता. जमीला या शाद अजीमाबादी आणि दाग देहलवी यांच्याकडे नवऱ्याला पाठवून आपल्या शायरीत सुधारणा करून घ्यायच्या. कारण त्या काळात मुस्लिम स्त्रियांसाठी पडदा पद्धतीचं काटेकोर पालन करणं आवश्यक होतं. जमीला यांना सतारवादनाचीही आवड होती. त्यांची ही आवड पूर्ण करण्यासाठी जमीला यांच्या नवऱ्यानं त्यांच्यासाठी एका ८० वर्षांचे सतार शिक्षक ठेवले होते. या शिक्षकांनी जमीला यांना पडद्याआड ठेवून सतार वाजवणे शिकवले. 

आज काबू में यह मिजाज नहीं
बेखुदी का कोई इलाज नहीं

जमीला खातून यांना आपले पीर व मुर्शिद हजरत मुर्शिद अली जमाल यांच्याबद्दल अपार भक्ती होती. त्यांच्या काळात जमीला यांनी अनेक रचना केल्या. त्यामुळेच जमिला यांच्या लिखाणात सुफियाना अंदाज दिसतो. जमीला यांच्या शायरीचा अभ्यास केल्यास, त्यांच्यातील शायरा होण्याची क्षमता व योग्यतेचा पुरावा मिळतो. शास्त्रीय शायरीला अनुसरून त्यांनी त्यांच्या रचनांमध्ये नोंदवलेली निरीक्षणं कौतुकास्पद आहेत. उतारवय, पतीचं आजारपण आणि त्यातच मुलांनी सोडलेली साथ अशा कठीण काळात जमीला यांनी स्वत:च्या पतीची खूप साथ दिली. जमीला यांची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर, मौलवी खुदा बक्श यांनी जमीला यांना त्यांचा ‘दिवाण’ प्रकाशित करण्याचे आदेश दिले.आणि अशा प्रकारे जमीला यांचा पहिला दिवाण प्रसिद्ध झाला.       

लेखिकेचा संपर्क : ८३२९५५०३१५